Gold and Silver Rate: सोने-चांदीच्या किमतीचा उच्चांक; जाणून घ्या काय आहे कारण
esakal October 20, 2024 01:45 PM

सराफा बाजारात शनिवारी सोने, चांदीच्या दरात वाढ होऊन इतिहास रचला गेला. सोन्यात एकाच दिवसात चारशे रुपयांची वाढ झाली. सोने 'जीएसटी' सह प्रति दहा ग्रॅम ८० हजार ३४० रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरात चार हजारांची वाढ होऊन ती 'जीएसटी'सह एक लाख ९४० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर शनिवारी सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. सोन्याचा भाव तेव्हा ७५ हजार ८०० रुपये प्रति दहा ग्रॅम (विनाजीएसटी) होता. सोन्याचे दर शुक्रवारी ७७

हजार ६०० प्रति दहा ग्रॅम (विनाजीएसटी) होते तर चांदी ९२ हजारांवर होती. त्यात काल (ता. १८) दोन हजारांची वाढ होऊन चांदी ९४ हजार प्रतिकिलोवर पोहोचली होती. आज त्यात चार हजारांची वाढ झाली. 'जीएसटी' सह सोने शनिवारी ८० हजार ३४० (प्रतिदहा ग्रॅम), चांदी एक लाख ९४० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. महिनाभर सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. चांदीने एक लाखांवर पोहोचून इतिहास रचला आहे. तर सोनेही दिवाळीपर्यंत नव्वद हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले,

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.