Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक
Times Now Marathi October 20, 2024 01:45 PM

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसह लोकलने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. आज म्हणजेच रविवार 20 ऑगस्ट रोजी घराबाहेर पडत तुम्ही लोकलने प्रवास करणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहूणच घराबाहेर पडा. कारण देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेतर्फे आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान कसं असेल रेल्वेच वेळापत्रक जाणून घ्या.


ठाणे- कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेने घेतलेल्या या ब्लॉकनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी 19 ऑगस्ट रोजी 11 वाजून 30 मिनिटे, 11 वाजून 51 मिनिटे आणि रविवार 20 ऑगस्ट 2024 रोजी 12:12 AM वाजता सुटणाऱ्या धीम्या लोकल संदर्भात बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, या लोकल मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर धावतील. या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाही. तसेच या लोकल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटांनी उशीरा धावतील.

यासह रविवारी पहाटे 3 वाजून 23 मिनिटे आणि 3 वाजून 57 मिनिटांनी कल्याण येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्या कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर धावतील. या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर रेल्वे स्टेशनवर थांबणार नाहीत. या लोकल देखील आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटांनी धावतील.

हार्बर मार्गा मेगाब्लॉक
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या या ब्लॉक दरम्यान हर्बर मार्गावर देखील ब्लॉक राहील. या ब्लॉकनुसार, हार्बर मार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटे ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. रेल्वेतर्फे अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुसार, सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहील.

या मार्गावर लोकल रद्द केल्याने प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहे. तर ट्रान्सहार्बर लाईन आणि वेस्टर्न लाईनवर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक असणार नाही.

कसारा रेल्वे स्थानकात 22 तासांचा ब्लॉक
दरम्यान, कसारा रेल्वे स्थानकावर देखील रेल्वेतर्फे 22 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 3:20 AM मिनिटांपासून ते रविवारी मध्यरात्री 1:20 AM पर्यंत राहील.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.