Horoscope 20 October: 'या' राशीच्या लोकांना गुरूकृपा लाभेल
esakal October 20, 2024 01:45 PM

मेष :

आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

मिथुन :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घ डेल.

तुळ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

वृश्चिक :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मकर :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.

कुंभ :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.