IND vs NZ: भारताच्या पराभवाला जबाबदार कोण? रोहित शर्माने दिले 'हे' उत्तर
Times Now Marathi October 20, 2024 08:45 PM

Rohit Sharma Statement: न्यूझीलंडने बेंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. यासह किवी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 46 धावांत ऑलआऊट झाला होता. त्यानंतर टीम इंडियाला डावाने पराभवाचा धोका होता. पण टीम इंडियाने दुसऱ्या डावा खूप झुंज दिली. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.

पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

बंगळुरू कसोटीतील पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला की, 'आम्ही दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. पण आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली नाही. त्यामुळे आम्हाला माहित होते की काय होणार आहे. काही खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. मात्र जेव्हा तुम्ही 350 धावांनी मागे असता तेव्हा तुम्ही जास्त विचार करू शकत नाही, फक्त चेंडू पाहुन आणि फलंदाजीकडे लक्ष द्यायला हवे होते आणि तेच फलंदाजांनी केले. आमचा आधीच पराभव झाला असता. पण आम्ही चांगला प्रयत्न केला, त्याचा मला अभिमान आहे.'

पंत आणि सर्फराजचे कौतुक

पुढे बोलताना म्हणाला की, 'जेव्हा पंत आणि सर्फराज फलंदाजी करतात तेव्हा प्रत्येकजण उत्साहित असतो. ऋषभने सुरुवातील काही चेंडू सोडले आणि नंतर शॉट खेळले. सर्फराजनेही परिपक्वता दाखवली. आम्हाला माहित होते की सामन्याचा सुरुवातीचा काळ कठीण असेल, परंतु आम्ही 46 धावांवर बाद होण्याची अपेक्षा केली नव्हती. न्यूझीलंडने चांगली गोलंदाजी केली मात्र आम्ही त्याचे उत्तर देऊ शकलो नाही. खेळात असे होत राहते, आम्ही यातून पुढे जाऊ. याआधी आम्ही इंग्लंडविरुद्ध एक सामना गमावला आणि त्यानंतर चार सामने जिंकत मालिका जिंकली होती. त्यामुळे आपच्यापैकी प्रत्येकाला कशावर काम करायचे आहे त्याची माहिती आहे.'

पुण्यात रंगणार दुसरा सामना

यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे. भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास भारताला मालिका गमवावी लागेल. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.





© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.