IND vs PAK : Abhishek Sharma ला पाकिस्तानी गोलंदाज 'चल निघ' म्हणाला, मग काय पुढे राडाच झाला Video Viral
esakal October 20, 2024 08:45 PM

India vs Pakistan Controversy Asia cup 2024 : आशिया इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानची बेक्कार धुलाई केली आहे. त्यामुळेच फ्रस्ट्रेटेड झालेल्या पाकिस्तानी गोलंदाजांकडून भारताच्या फलंदाजांना डिवचण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा काहीच परिणाम भारताच्या कामगिरी झाला नाही आणि त्यांनी चांगला चोप दिला आहे. पाकिस्तानी गोलंदाज Sufiyan Muqeem आणि भारताचा Abhishek Sharma यांच्यात शाब्दिक वाद झालेला पाहायला मिळाला आणि त्याचे राड्यात रुपांतर होण्यापूर्वीच अम्पायरने अभिषेकला रोखले...

अभिषेक शर्मा व प्रभसिमरन सिंग यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६८ धावा चोपल्या. सातव्या षटकात पाकिस्तानला ही जोडी तोडण्यात यश आले. सुफियानने विकेट मिळवताना अभिषेकला माघारी पाठवले. सुफियानने हाताने इशारा करताना अभिषेकला चल निघ असे म्हटले आणि त्यानंतर अभिषेकचा पारा चढला. त्यानेही शिवी हाणल्याचे व्हिडीओत दिसतेय. वाद पेटणार हे लक्षात येताच अम्पायर मध्ये आले आणि अभिषेकला समजावून मैदानाबाहेर जाण्यास सांगितले.

अभिषेक २२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर माघारी परतला. प्रभसिमरन १९ चेंडूंत प्रत्येकी ३ चौकार-षटकार लगावत ३६ धावांवर बाद झाला. तिलक वर्माने ३५ चेंडूंत ४४ धावांची खेळी केली, तर नेहाल वढेराने २५ आणि रमनदीप सिंगने १७ धावांची खेळी केली. भारताने २० षटकांत ८ बाद १८३ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात अंशूल कम्बोजने दुसऱ्याच चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद हॅरिसचा त्रिफळा उडवला. यासिर खान ( ३३) व कासिम अक्रम ( २७) माघारी परल्याने पाकिस्तानची अवस्था १३.४ षटकांत ४ बाद ११८ धावा अशी झाली होती.

तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभ सिमरन सिंग (यष्टीरक्षक), वैभव अरोरा, आयुष बडोनी, नेहल वढेरा, रसिख सलाम, निशांत सिंधू, अंशुल कंभोज, रमनदीप सिंग, हृतिक शोकीन,राहुल चाहर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.