Maharashtra News Live Updates: नांदेड मधील देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे स्वराज्य पक्षात प्रवेश करणार
Saam TV October 21, 2024 06:45 AM
ठाणे जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा ठाणे जिल्ह्यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापुर तालुक्यात जवळपास ८० ते ९० टक्के भातशेती या पावसामुळे अक्षरशः वाया गेली आहे.

नांदेड मधील देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे आज स्वराज्य पक्षात प्रवेश करणार दिल्लीच्या प्रशांत विहार परिसरातील CRPF शाळेजवळ स्फोट

दिल्लीच्या प्रशांत विहार परिसरातील CRPF शाळेजवळ स्फोट

दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली

घटनास्थळी पोलिसांना कुठलही सदिग्ध गोष्ट सापडली नाही

थोड्याच वेळात पोलिसांकडून FIR दाखल केला जाणार

दिल्ली पोलिसांसोबत NSG आणि स्पेशल सेल ची टीम देखील घटनास्थळी दखल

पोलिसांकडून आजूबाजूच्या CCTV कॅमेऱ्यांची तपासणी सुरू

पोलिस यंत्रणा घटनुळे अलर्ट मोडवर

बीडच्या मुळकवाडीत भर रस्त्यावर गोळीबार

बीडच्या मुळकवाडी येथे भर रस्त्यावर गोळीबार केल्याची घटना घडलीय.. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..संदीप तांदळे असं जखमी व्यक्तीचे नाव आहे..

सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड सहपत्नी पारंपारिक पोशाखात मुळगावी दाखल झाले

देशाचे सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांनी आज त्यांचे मुळगाव असलेल्या खेड तालुक्यातील कन्हेरसर येथे सहपत्नी पारंपारिक पोशाखात कुलदैवत यमाई देवीचे दर्शन घेतले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांचे स्वागत केलेय सरन्याधीश धनंजय चंद्रचुड सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्याच मुळगावी येत असल्याने ग्रामस्थांनी स्वागत करुन सन्मान केलाय.

रत्नागिरी - चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी रंगणार सामना

रत्नागिरी - चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी रंगणार सामना

दोन्ही उमेदवारांची नावं जवळपास निश्चित

चिपळूणमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतच होणार कांटे की टक्कर

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार शेखर निकम, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार प्रशांत यादव

रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे फक्त चिपळूणची जागा

चिपळूणची जागा निवडून आणण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही कसली आहे कंबर

गेल्या महिन्यात झाल्या होत्या दोन्ही नेत्यांच्या सभा

मातोश्रीवर साडेबारा वाजता तातडीची बैठक

उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक..

बैठकीत शिवसेना उद्धव ठाकरे मध्ये येणाऱ्या इनकमिंग बाबत होनार चर्चा...

शिंदे सोबत गेलेल्या आमदारांपैकी काही आमदार परत उद्धव ठाकरे गटाकडे येऊ इच्छितात... त्याबाबत बैठकीत होईल चर्चा

परत येणार आमदारांना घेणार नाही अशी उद्धव ठाकरेंची भूमिका...

तसेच इतर पक्षातूनही अनेक मान्यवर नेतेमंडळी देखील उद्धव ठाकरे गटात येण्याच्या प्रतीक्षेत

बीड - पैशाचा पाऊस पाडतो म्हणत तब्बल 45 लाखांचा गंडा..

बीड शहरातून अंधश्रद्धाविषयी पुन्हा एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.. तांत्रिक विद्या अवगत करून पैशांचा पाऊस पाडतोत..आम्ही तुला मालामाल करतो, असे म्हणत बीड शहरातील एका लॅब टेक्निशीयनला तब्बल ४५ लाख २३ हजार ३१५ रुपयांचा गंडा घातला आहे.

संजय राऊतकाल साधारण दहा तास बैठक झाली त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता हा मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली शायना एन सी वरळी विधानसभा मतदारसंघात सक्रीय

महायुतीच्या वरळी विधान सभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार शायना एन सी वरळी विधानसभा मतदारसंघात सक्रीय.

शायना एन सी यांनी वरळी मतदारसंघातील सर्व महापालिका वॅार्डातील मतदारांशी संपर्क वाढवला.

वरळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसमाजाच्या मतदारांशी शायना एन सी यांनी भेटीगाठी सुरू केल्या.

विधानपरिषदेचे माजी सदस्य जेष्ठ नेते नरेंद्र बोरगांवकर यांचे वृद्धापकाळाने निधन

विधानपरिषदेचे माजी सदस्य जेष्ठ नेते नरेंद्र बोरगांवकर यांचे वृद्धापकाळाने निधन

धाराशिव व लातुर जिल्हा एकञ असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर होते कार्यरत

तुळजाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिव पदावर केले काम

तुळजापूर रोडवरील मोतीझरा स्मशानभूमीत दुपारी ४.३० वाजता होणार अंत्यसंस्कार

Khandala Ghat Traffic: खंबाटकी घाटात वाहतूक ठप्प, कंटेनर बंद पडल्याने ट्रॅफिक जाम

खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने येणारी वाहने घाटात अडकून पडली आहेत. आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि साताऱ्याचा दिशेने वाहने निघाली असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने गरम होऊन बंद पडली आहेत. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडीत भर पडली आहे.शिरवळ रेस्कु टीम,भुईज पोलीस, खंडाळा पोलीस महामार्ग पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी काढण्याचं काम सुरू करण्यात आला आहे.

Nashik News: दिंडोरीत नरहरी झिरवाळांचे वाढले टेन्शन

- दिंडोरीत नरहरी झिरवाळांचे वाढले टेन्शन

- दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर शिंदेच्या शिवसेनेकडून दावा

- माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आणि पदाधिकारी घेणार थोड्याच वेळात वर्षावर घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

- नागपूरात झालेल्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी दिंडोरीची जागा लढवण्याचा शब्द दिला होता

- त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटेल, धनराज महाले यांचा दावा

Sangli News: जत मतदार संघातून सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक

सांगलीच्या जत मतदार संघातून सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. मुंबईत संजय राऊत यांच्यासह भास्कर जाधवांची तुकाराम बाबा महाराज यांनी शिवसेना पदाधिकारयां सोबत भेट घेतली आहे.सांगली जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जत मतदारसंघातून तुकाराम बाबा महाराजांना उमेदवारी देण्याची एकमताने मागणी केली आहे.जत हा

काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचा मतदारसंघ आहे,त्यामुळे तुकाराम बाबा महाराजांच्या उमेदवारीच्या मागणीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.

दिवाळीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी वर्गातच तयार केले, आकाश कंदील, पणत्या, किल्ल्यावरील मातीच्या बाहुल्या....

जगद्गुरू संत तुकोबांच्या देहूतील अभंग इंग्लिश शाळेतील मुलांना दिवाळी सणानिमित्ताने शाळेतील वर्गात आकाश कंदील, पणत्या, किल्ल्यावरील मातीच्या बाहुल्या, आणि सजावटीला लागणाऱ्या रंगीबेरंगी वस्तू तयार करण्याचे धडे दिले जात आहे, तर विविध रंगातील या वस्तू घेण्यासाठी समस्त देहूकर अभंग इंग्लिश स्कुल च्या दिवाळी मेळाव्याला भेटी देऊ लागले असून या वस्तू विकून जो नफा मिळतोय तो समाज कार्याला म्हंजे अनाथ आश्रमाला देण्यात येतो त्यामुळे या शाळेतील चिमुकले सामाजिक उपक्रम राबवित असल्याने या मुलांचा या निमित्ताने शाळेत अभ्यासक्रम घेण्यात येतो.. गेली तीन वर्षांपासून देहूतील या शाळेचा हा उपक्रम सुरू आहे..

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का

हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक सोडणार अजित पवार यांची साथ

अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे सोडणार अजित पवार यांची साथ

हडपसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात लढवणार निवडणूक

आनंद अलकुंटे माजी नगरसेवक

सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पीएमपीएल चे माजी संचालक म्हणून ही काम केलं आहे.

हडपसर मधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक दादाची साथ सोडणार

मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसर मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार..

Rain Update : बीड - बीडच्या केज तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

बीडसह केज तालुक्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. यादरम्यान वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतराम देवडकर रा. नाथापूर असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर या पावसामुळे कापसाचे व काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले असून बीड तालुक्यातील वंजारवाडी परिसरात नदीला पूर आल्याचं पाहायला मिळालं...

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुण्याला लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन

पुण्यातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेस झाल्या होत्या सुरू

पुणे ते कोल्हापूर,पुणे ते हुबळी तसेच मुंबई ते सोलापूर अशा 3 वंदे भारत रेल्वे गाड्या पुण्याला मिळाल्या आहेत

त्यातच अजून काही नव्या वंदे भारत गाड्यांची भर यात पडणार आहे त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे

पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन होणार सुरू

शिरूर - हवेली विधानसभेत आयात उमेदवार देवू नये राष्ट्रवादी अजित पवार गट पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक

शिरूर - हवेली विधानसभा मतदार संघ भाजपकडे राहणार की राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे जाणार याबाबत रस्सीखेच सुरू आहे.

मात्र हा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला तरी पक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे.

मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक घेवून आमच्यातील पाच ईच्छुकापैकीच उमेदवारी घावी असे पत्र पवार यांना दिले आहे.

वाघोलीत शिरूर व हवेली या दोन तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाने आयात उमेदवार न देता आम्ही पाच जण जे ईच्छुक आहोत. त्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी.तुम्ही या पाच पैकी जो उमेदवार द्याल तो आम्हाला मान्य राहील.आम्ही त्यासाठी काम करू. असे मत या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडले.

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पकडली दोन कोटी रुपयांची दारू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक कोटी दोन लाखाची विदेशी दारू जप्त केली आहे. गोवा राज्यातील मडगाव येथून इंदौर, मध्य प्रदेशला विदेशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे बायपास रोडवरील अरणगाव शिवारात सापळा लावून हा ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दीपक पाटील, शहाजी पवार, शैलेश जाधव या तीन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपींची कसून चौकशी करून या विदेशी दारूचे मध्यप्रदेश कनेक्शनच्या मुळाशी जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.