Maharashtra News Live Updates: अंधेरी पूर्व येथून इच्छुक असणारे मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
Saam TV October 21, 2024 04:45 PM
Mumbai News: अंधेरी पूर्व येथून इच्छुक असणारे मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

अंधेरी पूर्व येथून इच्छुक मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी भरला होता अर्ज

अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्याने घेतली होती माघार

शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके याठिकाणी आमदार

लोकसभा निवडणुकीत याठिकाणी महायुतीला मिळाले होते मताधिक्य

शरद पवार कालही आपले दैवत, आजही व उद्याही आपले दैवत राहणार - पूर्वा वळसे पाटील

शरद पवार कालही आपले दैवत, आजही व उद्याही आपले दैवत राहणार असल्याचे मोठं विधान मंत्री दिलीप वळसेपाटीलांची कन्या पुर्वा वळसे पाटीलांनी केलय

वळसेपाटीलांना आपल्या वडीलांपेक्षा पवार साहेबांचा सहवास अधिक लाभल्याचा निर्वाळा करत शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्याशी आपला वाद नसल्याचे जाहिरपणे पुर्वा वळसेपाटील यांनी जाहिर भाषणातुन स्पष्ट केलं.

वरळीत शिवसेना विरुद्ध शिवसेना

हायप्रोफाईल वरळी विधानसभा मतदारसंघातून शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक लढवणार.

हायप्रोफाईल वरळी विधान सभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एन सी असा सामाना होणार.

वरळी विधानसभेत मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच होणार लढत.

शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या विधानसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच लढत करण्याची महायुतीची रणनिती.

बबन शिंदे आज शरद पवारांची तुतारी हाती घेणार...सूत्रांकडून माहिती बबनराव पाचपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल बच्चू कडूभाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागला अशी सध्या स्थिती आहे. भाजपच्या खांद्यावर पंजा फडकवण्याची स्थिती एकंदरीत माझ्या मतदारसंघात भाजपची आहे. जिल्ह्यात भाजपा ठेवायचीच नाही अशी राणा कुटुंबाने व्यवस्था निर्माण केली आहे. आमदार सुनील शेळके यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी थोपटले दंड उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगोल्यातून दिपक साळुंखे यांना तिकीट देण्याची शक्यता भाजपचे विशाल परब अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी टाळण्यासाठी आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण मैदानात उतरणार आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण हे आज सिंधुदुर्गात येत असून भाजप युवा नेते विशाल परब व रवींद्र चव्हाण यांच्यात आज बैठक होईल. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात आणखी एक बंडाचे निशाण असून भाजपचे विशाल परब अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी आज रवींद्र चव्हाण व विशाल परब यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे.

पन्नास खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱया वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपजेव्हा महायुतीच्या उमेदवाराचे चेहरे समोर येतील तेव्हा जनता महायुतीला मतदान करेल, जनता महायुतीचा सरकार आणण्यासाठी मतदान करणार आहे. दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येणार आहे, बैठक चर्चा होऊन त्याही यादी येईल. प्रभावशाली उमेदवार देण्याचा सूत्र पक्षाच आहे. त्या अनुषंगाने चर्चा करत आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड जागा परंपराग भाजपची आहे. त्यामुळे भाजपकडे राहील असे दिसते, चर्चा सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे, भाजपसामाजिक आंदोलन जरांगेने उभं केलं, त्यांना वाटतं त्यांचे आमदार निवडून आले तर समाजाचे प्रश्न सुटतील, तर लोकशाही सर्वांना अधिकार आहे. Maharashtra News Live Updates: सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून महायुतीमध्ये सुरूय रस्सीखेच

सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून गेल्याने महायुतीतील इच्छुकांचा आशा झाल्या आहेत पल्लवीत

सोलापूर शहरमध्य मतदारसंघावर शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी कडून केला जातोय दावा

सोलापूर शहर मध्य कडून शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी केला आहे दावा

तर भाजपकडून देवेंद्र कोठे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुबेर बागवान आहेत प्रबळ दावेदार

जागावाटपात पारंपरिक पद्धतीने ही जागा शिवसेनाला सुटते,मात्र महायुती मधील प्रत्येक पक्ष यंदा नशीब आजमावण्यासाठी झाला आहे सज्ज

सोलापूर शहरमध्य मतदारसंघातून मागच्या 15 वर्षांपासून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे होत्या आमदार,मात्र यंदा प्रणिती खासदार झाल्याने महायुतीत इच्छुकांची झाली आहे भाऊगर्दी

Maharashtra News Live Updates: भंडारा विधानसभेच्या जागेवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही धुसफूस

महाविकास आघाडीमधील जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भंडारा विधानसभा हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून या मतदार संघासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. भंडाऱ्याच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही जागा प्रतिष्ठेची केली आहे. भंडाऱ्यात शिवसेनेचं अस्तित्व नसल्यानं काँग्रेसचा दावा मजबूत असल्याची भूमिका काँग्रेसनं मांडली आहे. तर, मागील तीन निवडणुका शिवसेनेनं लढल्यात आणि त्या जिंकल्यामुळं भंडाऱ्याची जागा आम्ही सोडणार नाही....वेळ पडल्यास शिवसेना स्वबळावर ही जागा लढेल आणि जिंकेल, असा दावा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भंडाऱ्याच्या जागेवरून राज्यस्तरावरील नेत्यांमध्येचं नाहीतर, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही धुसफुस सुरू असल्याचं चित्र आता बघायला मिळत आहे.

निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे

मुंबई विद्यापीठाने निवडणुकीच्या कारणास्तव नियोजित परीक्षा ढकलल्या पुढे

19 आणि 20 नोव्हेंबरला होणारे पेपर पुढे ढकलले

विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावे यासाठी मुंबई विद्यापीठाचा निर्णय

विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे

मात्र, या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या

Maharashtra News Live Updates: आमदार शहाजीबापूंच्या मदतीसाठी भाजपचे दोन हजार कार्यकर्ते मैदानात

सांगोला विधानसभा मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार व अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या मदतीसाठी भाजपचे दोन हजार कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.