Sinnar Assembly Election 2024 : कोकाटेंसमोर तगडे आव्हान
esakal October 21, 2024 06:45 PM

सिन्नर मतदारसंघात सलग तीन वेळा निवडणूक जिंकणारे माणिकराव कोकाटे २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात पराभूत झाले होते. त्यानंतरच्या २०१९ च्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीतून निवडणूक लढले.

शिवसेनेचे वाजे यांचा त्यांनी २०७२ इतक्या निसटत्या मतांनी पराभव केला होता. या खेपेला वाजे शिवसेना (उबाठा)कडून खासदार असून कोकाटे यांना अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांच्या विरोधात उदय सांगळे यांचे तगडे आव्हान आहे.

सांगळे हे शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असून ही उमेदवारी न मिळाल्यास त्यांची अपक्ष लढण्याची तयारी आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरमध्ये खासदार असलेल्या राजाभाऊ वाजे यांची भूमिका केंद्रस्थानी असणार आहे. (Sinnar Assembly tough challenge for Kokate)

अशी आहे स्थिती

- पाचव्यांदा विधानसभेची पायरी चढवणाऱ्या कोकाटे यांना अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित.

- शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी चार ते पाच जण इच्छुक

- उदय सांगळे यांची राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडे फिल्डिंग

- मतदार संघात सांगळे विरुद्ध कोकाटे अशीच दुरंगी लढत बघायला मिळेल असे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.

- शरद पवार व खासदार राजाभाऊ वाजे यांची भूमिका सिन्नरच्या राजकीय पटलावर महत्त्वाची ठरेल.

असे आहेत निवडणूक मुद्दे

सिन्नर शहरातील पाणी प्रश्न, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, उद्योग नगरी म्हणून विकसित होणाऱ्या सिन्नर मधील औद्योगिक वसाहतींमधील अपुऱ्या सुविधा, उद्योगांचे होणारे स्थलांतर , व त्यातून रोजगार निर्मिती वर होणारा परिणाम, इंडिया बुल्स चा सेझ प्रकल्पाची जागा एमआयडीसी कडे हस्तांतरित झाल्यास उद्योगांना नवी संधी.

२०१९ चे चित्र

माणिकराव कोकाटे

(राष्ट्रवादी)

मिळालेली मते- ९७०११

मताधिक्य २०७२

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.