बहुचर्चित गारुड सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पण निवडकच चित्रपटगृहांमध्ये सिनेमा होणार प्रदर्शित
जयदीप मेढे October 21, 2024 08:43 PM

Marathi Movie :  बहुचर्चित 'गारुड' (Garud Marathi Movie) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिवसांपासून या सिनेमची बरीच चर्चा होती. शोधाच्या वाटेत हरवलेलं हे नेमकं गारुड काय असेल याची छोटीशी झलक नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या गारुड सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सिनेमाच्या ट्रेलरनेही सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. पण येत्या 25 ऑक्टोबरपासून गारुड हा चित्रपट महाराष्ट्रातील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गारुड चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक गुपित लपलेली पाहायला मिळत आहेत. सटवाईने जे नशिबात लिहिलं आहे ते घडतंच, असं म्हणत चित्रपटात या पात्रांबरोबर नेमकं काय काय घडलं हे पाहायला मिळतंय. सूडाची भावना, सत्य-असत्याचा शोध, दडलेली अनेक रहस्ये आणि माणसातलं हरवलेलं माणूसपण हे सारं 2.38 मिनिटांच्या या 'गारुड' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 

सिनेमात 'हे' कलाकार झळकणार

अखेर मन, मेंदूवर बसलेलं हे गारुड सुटणार का?, हे मात्र २५ ऑक्टोबर पासून कळेल. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी, दमदार अभिनेते शशांक शेंडे यांसह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे या कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.                                 

'किमयागार फिल्म्स एल एल पी' आणि 'ड्रीमव्हीवर' निर्मित आणि 'सनशाईन स्टुडिओ' प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निर्माते ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी केली असून सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोद चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोराम या निर्मात्यांनी बाजू सांभाळली आहे. दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे याचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित आहे. चित्रपटातील रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी संभाळली आहे.  चित्रपटाच्या संगीताबरोबरचं पार्श्वसंगीत हे वाखाणण्याजोगे आहे. ही पार्श्वसंगीताची धुरा संकेत पाटीलने संभाळली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sachin valanju (@sachin_valanju)

ही बातमी वाचा : 

Marathi Actor : 'आज सर्व पक्षांतील साहेबांच्या कृपेकरुन...', ठाण्यातील घोडबंदर रोडवरील समस्यांवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.