MNS Candidates: मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्यात राज ठाकरेंचे दोन उमेदवार देणार कडवी झुंज! नावे जाहीर
esakal October 22, 2024 02:45 AM

Raj Thackeray Candidates Announced: मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचे पहिले दोन उमेदवार जाहीर केले आहे. कल्याणमधून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. ते २४ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार आहे. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

आज राज ठाकरे यांनी पुण्यातील नेत्यांची मुंबईत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील ८ मतदारसंघात उमेदवार निश्चिती केली आहे. पुण्यातील ८ मतदारसंघात राज ठाकरेंचे उमेदवार ठरले आहेत. आता लवकर त्यांची यादी जाहीर होणार आहे. याआधीच राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात कल्याण मतदारसंघातून राजू पाटील यांना पुन्हा संधी देऊन त्यांना मनसेकडून उमेदवारी दिली आहे. तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

याबाबत राज ठाकरे यांनी सांगितले की, आमचे बाकी उमेदवार लवकरच जाहीर होतील. मात्र त्याआधी मी कल्याण आणि ठाणे मतदारसंघातून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना मनसेचे उमेदवार घोषित करत आहे. हे दोघेही २४ ऑक्टोबरला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. तसेच हा अर्ज दाखल करण्यासाठी मी स्वत: उपस्थित राहणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.