Mahayuti News : लाडक्या बहिणींच्या समोरच CM शिंदेंनी उमेदवाराचे नाव केले जाहीर; खडसेंच्या बालेकिल्ल्यातील लढत ठरली ?
Sarkarnama October 22, 2024 06:45 AM

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा 15 ऑक्टोबरला करण्यात आली आहे. तर मंगळवारपासून अधिसूचना जारी होणार आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी घोषणा अजून करण्यात आलेली नाही. त्यातच विधानसभा रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जागावाटपाची यादी जाहीर होण्यापूर्वी पहिल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली आहे. (Mahayuti News)

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी रविवारी भाजपने पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. महायुतीतील भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे () यांनी उमेदवारांची अधिकृत जाहीर करण्याआधी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत असलेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर करताना पाटील विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात दौरा करीत आहेत. सध्या ते जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जळगावात मुक्ताईचे दर्शन घेतले. त्यासोबतच अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे शिवसेनेत () पुन्हा स्वागत करण्यात आले. 'येत्या एक दोन दिवसांत संपूर्ण यादी जाहीर करणार आहे. अंतिम जागा लवकरच जाहीर होईल. गेल्या सव्वादोन वर्षांच्या कामाची पोच पावती नक्की मिळेल. महायुतीचा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील विजयी होणार आहे.

'लाडक्या बहिणी काहीही करू शकतात. आजच्या सभेची गर्दी पाहून समजते. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आम्ही हजार कोटींची कामे दिली आहेत. लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे, असे सांगितले जाते, मी बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचा शिवसैनिक असून एकदा जे बोलतो, तेच करतो, असे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.