Fashion Tips : साडीवर या नथी ट्राय करा
Marathi October 22, 2024 09:25 AM

आपला पारंपरिक मराठमोळा लूक साडीवर नथ घातल्याशिवाय पूर्ण होत नाही. नथ घातल्याने संपूर्ण लूक बदलून जाताे. नथ हा मराठी संस्कृती पिढ्यानपिढ्या जपणारा दागिना आहे. साडीसह नथ परिधान केल्यावर व्यक्तिमत्त्वाला एक खास लूक आणि शान मिळते तसेच साडीसह नथ घातल्याने सौंदर्य अजून वाढते. नथ फक्त सौंदर्य वाढवण्याचा दागिना नसून सांस्कृतिक परंपरेचा विशेष भाग आहे. आज आपण जाणून घेऊयात, साडीवर कोणत्या नथी ट्राय करू शकतो.

पूर्वीच्या काळी नथीमध्ये मर्यादित पर्याय उपलब्ध होते परंतु आजकाल नथीमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार पहायला मिळतील. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार नथी ट्राय करू शकता. बाजारात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला नथीचे असंख्य प्रकारचे डिझाइन पाहायला मिळतील.

साडीवर या नथी करा ट्राय

मराठमोळी नथ

जर तुम्ही मराठमोळा लूक करत असाल, तर ही पारंपरिक नथ तुमच्यासाठी योग्य आहे. ही नथ साडीवर खूप शोभून दिसते.

पेशवाई नाथ

पेशवाई साडी प्रमाणे पेशवाई नथ देखील असते. तुमच्या पेशवाई लूकला परिपूर्ण करण्यासाठी पेशवाई नथ उत्तम पर्याय आहे. लहान आकाराची, सिंम्पल आणि सोफिस्टिकेटेड नथ, पेशवाई साडीसोबत शोभून दिसते.

ब्राह्मणी नाथ

मोत्यांनी सजवलेली, साधी परंतु सुंदर नथ. सोबर लूकसाठी योग्य.

पुणेरी नाथ

मोती आणि धातूंनी बनलेली, ही साधी परंतु रॉयल लूक देणारी पुणेरी नथ कोणत्याही साडीवर खुलून दिसते.

कुंदन नाथ

जर तुम्ही हैवी लूक तसेच शाही लूक करत असाल ही कुंदन नथ लग्न किंवा खास समारंभासाठी उत्तम आहे.

साडीचा रंग आणि समारंभाच्या प्रकारानुसार तुम्ही या सर्व नथी निवडू शकता.

हेही वाचा : Hair Tips : गोल चेहऱ्याच्या महिलांनी ही हेअरस्टाइल करा ट्राय


संपादन : प्राची मांजरेकर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.