Sanjay Raut : 5 कोटी पकडले, कुठून फोन आला, त्याचे पुरावे आहेत, संजय राऊत यांचा मोठा दावा
GH News October 22, 2024 02:13 PM

महाविकास आघाडीच जागावाटप कुठपर्यंत पोहोचलय, त्या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना माहिती दिलीय. “काल शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत दीर्घ बैठक झाली. एनसीपी आणि शिवसेनेत एखाद दुसरी सीट सोडल्यास आमच्यात जास्त मतभेद नाहीत. आज सकाळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची शरद पवारांसोबत बैठक होईल. त्यानंतर ते मातोश्रीवर येतील. त्यानंतर काँग्रेस नेत्यांसोबत उद्धव ठाकरे आणि आम्ही शिवसेनेचे नेते चर्चा करु. त्यानंतर पुढे काय करायचं ते पाहू. सर्व ठीकठाक आहे, चिंता करु नका” असं संजय राऊत म्हणाले. मुंबई-विदर्भातील जागेवर तणाव आहे त्या संदर्भात प्रश्नावर राऊत म्हणाले की, “आम्ही बघू, मीडियात का चर्चा करु. होईल सर्व व्यवस्थित. तुम्ही चिंता करु नका”

पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर गाडीत 5 कोटी पकडले. त्यावरुन संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच नाव घेत महायुतीवर गंभीर आरोप केले. “पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर काल दोन गाडया पकडल्या. त्यात जवळपास 15 कोटी रुपये होते. मी बोललो होतो, एकनाथ शिंदे आपल्या माणसांना 50-50 कोटी पुन्हा देणार. 15 कोटीचा पहिला हप्ता जात होता. त्यात सांगोल्याचे गद्दार आमदार त्यांचे 15 कोटी जात होते. 5 कोटीचा हिशोब लागला. 10 कोटी सोडले. फोन आल्यावर एक गाडी सोडली. 5 कोटी आमच्या लोकांनी पकडून दिले. 150 आमदारांना 15-15 कोटी पोहोचले आहेत. उरलेले पैसे सुद्धा मिळतील” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

‘लवकरच 30 कोटी मिळणार’

“कशाप्रकारे पैसा वाटप सुरु आहे, त्याच हे एक उदहारण आहे. 5 कोटी कोटी साधारण रक्कम नाही. 10 कोटी सोडून दिले. मी त्याबाबत टि्वट केलय. 15 कोटींचा हिशोब होता. 15 कोटी पोहोचले, लवकरच 30 कोटी मिळणार. हे सर्व पैसे पोलीस संरक्षणात जातील” असा आरोप राऊत यांनी केला. पोलीस, इन्कमटॅक्सकडून कुठलीही माहिती मिळाली नाही, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरुन एक फोन आला. संपूर्ण विषय संपवला, त्याचे पुरावे आहेत. लवकरच समोर येतील”

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.