PAK vs ENG : इंग्लंड मालिका विजयासाठी तयार, तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर
GH News October 22, 2024 08:16 PM

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट टीमने तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. शान मसूद हा या मालिकेत पाकिस्तानचं नेतृत्व करत आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा तिसरा सामना रावळपिंडी येथे होणार आहे. रावळपिंडीतील खेळपट्टी स्पिनर्ससाठी फायदेशीर असणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 स्पिनर्सचा समावेश केला आहे. लेग स्पिनर रेहान अहमद याचा समावेश करण्यात आला आहे. रेहान व्यतिरिक्त शोएब बशीर आणि जॅक लीच यांचा समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज गस एटकिन्सन याचं कमबॅक झालं आहे. तर ब्रायडन क्रार्स आणि मॅथ्यू पॉट्स यांना डच्चू देण्यात आला आहे. तिसरा सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

पाकिस्तान इंग्लंड यांच्यातील ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. इंग्लंडने पाकिस्तानवर पहिल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवत आघाडी घेतली. तर त्यानंतर पाकिस्तानने दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसर्‍या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

रेहान अहमद याने 2022 साली पाकिस्तान दौऱ्यातच कसोटी पदार्पण केलं होतं. रेहानने तेव्हा पदार्पणात कराची कसोटीतील दुसर्‍या डावात 48 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडने हा सामना 8 विकेट्सने जिंकला होता.

इंग्लंडकडून 2 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाला मिळाली संधी?

तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॅमी स्मिथ (विकेटकीपर), गस एटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच आणि शोएब बशीर.

कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद, मोहम्मद हुरैरा, मेहरान मुमताज, मोहम्मद अली, हसीबुल्ला खान आणि मीर हमजा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.