Goa Live Updates: पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश
dainikgomantak October 22, 2024 10:45 PM
पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश

प्रदूषण नियंत्रण मंडळालचा परवाना नसताना रेस्टारंट चालवल्याप्रकरणी पणजीतील सांत ईनेज येथील काकुलो मॉलमधील केएफसीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस. परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश.

आंध्रप्रदेशने मारली बाजी, गोव्याचा अवघ्या 3 धावांनी पराभव

वरिष्ठ महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग तीन सामने जिंकल्यानंतर गोव्याला आंध्रविरुद्ध तीन धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. प्रीती यादवची 49 धावांची खेळी व्यर्थ ठरली.

फोटो पत्रकार संतोष मिरजकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांना 7 दिवसांचा अल्टिमेटम!

फोटो पत्रकार संतोष मिरजकर यांना केलेल्या मारहाणीत सहभागी पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची दक्षिण गोव्यातील पत्रकाराची मागणी केली. कारवाई न झाल्यास पत्रकार दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. शिवाय, दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांना 7 दिवसांचा अल्टिमेटम त्यांच्याकडून देण्यात आला.

कला अकादमीची सर्व कामे निकृष्ट दर्जाची: विजय केंकरे

कला अकादमीची सर्व कामे निकृष्ट दर्जाची. कामांच्या दर्जाबाबत कृती दल असमाधानी. 10 नोव्हेंबर रोजी कंत्राटदारांसोबत बैठक करणार, अशी माहिती विजय केंकरे यांनी दिली.

बागायतदार संस्थेवर पुन्हा सावईकरांचे वर्चस्व!

गोवा बागायतदार संस्थेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. 19 पैकी सर्वाधिक संचालक ॲड. नरेंद्र सावईकरांच्या गटाचे.

जीप असोसिएशच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार!

दुधसागर पर्यटन हंगामास सध्या विलंब झाला असून, जीप असोसिएशच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार. तसेच या संदर्भात योग्य तोडगा काढण्यास प्रयत्नशील : भाजप गटमंडळ अध्यक्ष विलास देसाई.

ईव्ही ड्रायव्हर्सच्या पगाराबद्दल KTCL चेअरमनचा खोटा दावा!! विजय सरदेसाई

केटीसीएल (KTCL)चे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दावा केला होता की ईव्ही (EV) बस चालकांना २४ हजार रुपये पगार दिला जातो पण प्रत्यक्षात त्यांना केवळ १६ हजार रुपये पगार दिला जात आहे. एकीकडे सरकार ईव्ही बसेसला चालना देत आहे तर दुसरीकडे गोव्यातील ईव्ही चालकांवर अन्याय देखील करतंय. अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे, केटीसी ईव्ही बसचालकांची भेट घेतल्यानंतर आमदार विजय सरदेसाई म्हणालेत.

गोवा बागायतदार संचालक मंडळ निवडणूक निकाल!

गोवा बागायतदार संस्थेच्या संचालक मंडळाच्या मतमोजणीस सुरुवात. संस्थेच्या एकूण १९ सभासदांपैकी ७ बिनविरोध निवडून आलेले संचालक वामन बापट (वाळपई), प्रशांत मराठे (वाळपई), संतोष केळकर (वाळपई), नूतन सतीश गावडे (फोंडा), कमलाक्ष टेंगसे (काणकोण), तनुजा सामंत (दक्षिण गोवा), रामनाथ गावडे (उत्तर गोवा एससी एसटी). उर्वरित १२ पदांसाठी १६ उमेदवार रिंगणात.

माजी मंत्री पावसकरांचा दुधसागर जीप असोसिएशनला पाठिंबा!

दुधसागरवरील जीटीडीसीची वेबसाईट बंद करण्याच्या जीप असोसिएशनच्या मागणीला सावर्ड्याचे माजी आमदार मंत्री दीपक पावसकरांचा पाठींबा दिलाय. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा केल्यानंतर पावसकरांनी जाहीर त्यांची भूमिका जाहीर केली.

भारताने लाँच केली चौथी अणु क्षेपणास्त्र पाणबुडी!

भारताने या आठवड्यात विशाखापट्टणममधील शिप बिल्डिंग सेंटर (SBC) येथे चौथी अणुऊर्जित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (SSBN) पाणबुडी प्रक्षेपित केली आहे. हे प्रक्षेपण भारताची आण्विक प्रतिकारशक्ती आणखीन मजबूत करेल. S4* कोडनेम असलेल्या या अणुऊर्जित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रचे प्रक्षेपण १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.