रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर
esakal October 23, 2024 01:45 AM

पिंपरी, ता. २२ ः रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०३ जणांनी रक्तदान केले. संकलित करण्यात आलेल्या रक्ताच्या बाटल्या थॅलेसिमिया सोसायटी ऑफ पुणे या संस्थेला देण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष अजय लंके, सचिव भूषण ढाके, खजिनदार भालचंद्र शितोळे, मेडिकल प्रोजेक्ट संचालक डॉ. महेश पाटील उपस्थित होते. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रोट्रॅक्ट क्लबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट रोट्रक्ट क्लबचे संचालक दृष्टी सिंग, कॅम्पस संचालक एडमिरल अमित विक्रम, क्लबचे अध्यक्ष अजय लंके, उपप्राचार्य सरनोबत, भूषण ढाके, दीपा लंके, दीपा जावडेकर, बलवीर चावला उपस्थित होते.
यावेळी सोहम वडजे या विद्यार्थ्यांची रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी कॉलेजच्या शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात २१३ जणांची तपासणी करण्यात आली. प्राधिकरण क्लबकडून निगडी येथील डी. वाय. पाटील वर्ड स्कूल आणि मॉडर्न स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावी अभ्यासक्रम ॲप्सचे वितरण करण्यात आले. दोन्ही शाळेतील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.