पीएमपीच्या 'पर्यटन बस'ला प्रवाशांची पसंती!
esakal October 23, 2024 01:45 AM

पुणे, ता. २२ : गेल्या दीड वर्षापासून पर्यटन बससेवा प्रवाशांच्या सेवेत असून, दिवाळीच्या सुट्यांमध्ये सहलीचा आनंद लुटण्यासाठी अल्पदरात पीएमपीची बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पर्यटन बससेवेसाठी स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बस सुरू केली आहे. त्यामुळे पर्यटन बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्येही सहलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाने केले.
बससेवा क्रमांक-१
हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर या मार्गाची बस सकाळी ९ वाजता सुटेल आणि दुपारी ४ वाजता पोहचेल. बसचा पहिला आणि शेवटचा थांबा हडपसर गाडीतळ असे आहे.
बससेवा क्रमांक-२
हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर असा मार्ग असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ६.३० वाजता पोहचेल.
बससेवा क्रमांक-३
डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन असे असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ५ वाजता पोहचेल.
बससेवा क्रमांक-४
पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, सिंहगड पायथा, पुणे स्टेशन असे असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, ४ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल.
बससेवा क्रमांक-५
पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशन असा असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ५.३० वाजता पोहचेल.
बससेवा क्रमांक-६
पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई मंदिर, छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ, पुणे स्टेशन असा आहे. बस सुटण्याची वेळ सकाळी ९ असून, सायंकाळी ५.३० वाजता पोहचेल.
बससेवा क्रमांक-७
भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी असा मार्ग असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहचेल.
बससेवा क्रमांक-८
पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, इस्कॉन मंदिर कोंढवा रोड, शिवसृष्टी आंबेगाव, स्वामी नारायण मंदिर नऱ्हे-आंबेगाव, पुणे स्टेशन असे बस मार्ग आहेत. बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ७ वाजता पोहचेल.

तिकीट दर किती?
पर्यटन बससेवा क्रमांक १ ते ८ या मार्गातील पर्यटनासाठी प्रतिप्रवासी ५०० रुपये तिकीट दर आहे.

पर्यटन बससेवेबाबत...
बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास पाच प्रवाशांच्या तिकीट दरात १०० टक्के सवलत असून, बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या पास केंद्रांवर होईल. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाइड सेवकाची नेमणूक केली जाईल. पर्यटन बससेवेचे तिकीट बुकिंग आणि स्थळांसंदर्भातील माहितीकरिता पीएमपीएमएलचे समन्वयक नितीन गुरव यांच्याशी ९८५०५०१८६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.