MP Supriya Sule : दोनच दिवसात बारामतीसह इतर जागांची यादी जाहिर करु
esakal October 23, 2024 01:45 AM

बारामती - आगामी दोन दिवसात बारामतीसह राज्यातील सर्वच जागांवरील उमेदवारांची यादी तुम्हाला समजेल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

बारामतीत कार्यकर्ता संवाद मेळाव्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकांच्या मनात असलेले व लोकांची सेवा करतील असेच उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात दिले जातील.

इंदापूरमध्ये प्रवीण माने निवडणूक लढविणार असल्याबाबत त्यांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, ते निवडणूक लढवू शकतात, पण माझ्या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी विरोधकांचा प्रचार केल्याचे मला आठवत आहे, असे त्या म्हणाल्या.

अप्पासाहेब जगदाळे व शहा कुटुंबांनी माझा प्रचार ताकदीने केला आहे, माझ त्यांच्याशी बोलण झाले आहे, ते विचार करुन सांगतो म्हणाले आहेत, त्यांनी कुणालाही दुखावले नाही.

अनेकांनी त्यांना फोन केले. हे दोघेही माझ्या संघर्षाच्या काळात माझ्यासोबत उभे राहिले. हे मी आयुष्यात विसरणार नाही, जे माझ्या संघर्षात माझ्यासोबत उभे राहिले नाहीत, त्यांनाही मी विसरणार नाही, कारण माझ्या तीन निवडणूकीत अनेकांनी मला मदत केलेली आहे. असे हसत हसत सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.