Maharashra Vidhansabha Election : मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी का? मतदारांमध्ये आहेत मतभेद?
esakal October 23, 2024 04:45 AM

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत का, यावर मतदारांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले.

Maharashra Vidhansabha Election : दिल्लीतील सेंटर फॉर द स्टडी (Center for the Study) ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) आणि पुण्यातील एमआयटी-स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (सॉग) यांच्या लोकनीती कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास २०२४’ मध्ये दिसून आलेले निष्कर्ष सादर केले आहेत. हा अभ्यास २१ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आला.

महाराष्ट्रातील ३९ विधानसभा मतदारसंघ आणि १३९ मतदान केंद्रांवर एकूण २,६०७ जणांची मुलाखत घेण्यात आली. हे ‘मल्टी-स्टेज’ यादृच्छिक नमुने होते. त्यानंतर, पद्धतशीर यादृच्छिक नमुना पद्धती वापरून प्रत्येक नमुना विधानसभा मतदारसंघांमधून चार मतदान केंद्रे निवडण्यात आली. १५६ मतदान केंद्रांची निवड करण्यात आली असली तरी १३९ मतदान केंद्रांवर अभ्यास करण्यात आला.

यासाठी एमआयटी-स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (सॉग)मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मोबाईल ॲप वापरून प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. विश्लेषण आणि अहवाल लोकनीती- सीएसडीएस आणि एमआयटी-स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (सॉग) यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. अहवाल तयार करण्यात संजय कुमार, सुहास पळशीकर, संदीप शास्त्री, देवेश कुमार, ज्योती मिश्रा आणि लोकनीती -सीएसडीएसच्या विभा अत्री आणि पुण्यातील एमआयटी-एसओजी येथील श्रीधर पबिशेट्टी, परिमल माया सुधाकर आणि व्ही. लेनिन कुमार यांचा समावेश होता.

MIT-SOG-Lokniti CSDS Findings from Study

अभ्यासात असं दिसून आलंय की, मागील काही वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जवळपास एकमत असले तरी या मुद्द्यावर मराठा समाज कशी प्रतिक्रिया देईल, याचा कोणालाही अंदाज नाही. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत का, यावर मतदारांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. मराठ्यांची मते विविध पक्षांमध्ये विभागली असल्याचे पूर्वी झालेल्या सर्वेक्षणांमधून दिसून आले आहे. पण, अनपेक्षितपणे, मराठा मतदार महायुतीच्या एकदमच विरोधात गेले आहेत, असेही चित्र नाही. उलट, हा अभ्यास ज्यावेळी सुरू होता, तेव्हा मराठा मतांच्या बाबतीत महायुतीची बाजूच काहीशी भक्कम असल्याचे दिसून आले. दरम्यान, मनोज जरांगेनी निवडणूक लढवावी का? हा प्रश्न विचारण्यात आला. यावर काहींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

MIT-SOG-Lokniti CSDS Findings from Study
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.