Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे जिल्ह्याध्यक्ष संदीप नाईक यांनी वाजवली 'तुतारी'
Sarkarnama October 23, 2024 04:45 AM
संदीप नाईक यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. संदीप नाईक हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

NILESH RANE.jpg Nilesh Rane Join Shivsena: नीलेश राणे उद्या शिवसेनत प्रवेश करणार

भाजपचे नेते, माजी खासदार नीलेश राणे हे उद्या शिवसेनेत प्रवेशे करीत आहे. त्यापूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदे आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपने मला खूप दिले, पण ज्या पक्षातून माझ्या वडीलांनी राजकारणाला सुरवात केली. त्यात शिवसेनेत मी प्रवेश करीत आहे, याचं मला समाधान वाटते, असे नीलेश राणे म्हणाले.

Chetan Tupe, Nana Bhangire Hadapsar Assembly Election 2024: दोन्ही शिवसेनेचा हडपसरवर दावा

हडपसर विधानसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीत अजित पवार यांना सुटली आहे. पण या जागेवर शिवसेना शिंदे गटातील नेते शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे हडपसर विधानसभा मतदारसंघातून 28 तारखेला मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार आहे. शिवसेनेला हडपसर विधानसभा मतदारसंघ मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करीत आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार महादेव बाबर हेही ही जागा मिळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह करीत आहेत.

baba siddiqui | Lawrence Bishnoi.jpg बिष्णोईला ठार मारण्यासाठी करणी सेनेकडून कोट्यवधींचं बक्षीस

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई या गँगविरोधात क्षत्रीय करणी सेनेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. जेलमध्ये असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई याला ठार मारणाऱ्यांसाठी करणी सेनेकडून कोट्यवधींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. क्षत्रीय करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून बिष्णोईला संपवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ना 1,11,11,111 चं बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर केल्याचे वृत् आहे.

Assembly Election 2024: पुण्यात आता दररोज नाकाबंदी

राज्यात आचारसंहिता लागू झाली असताना पुण्यात पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आजपासून दररोज नाकेबंदी करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. खेड-शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून आनंद अलकुंटे आज अर्ज भरणार

अजित पवारांची साथ सोडून हडपसर विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक आनंद अलकुंटे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. शक्ती प्रदर्शन करीत ते आज अर्ज दाखल करणार

Maharashtra Politics NCP shivsena candidate list 2024 will be announced: आज राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आज आपल्या उमेदवाऱ्यांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. या याद्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. भाजपने दोन दिवसापूर्वी पहिली यादी जाहीर करुन ९९ जणांना उमेदवारी दिली आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.