अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाचा उमेदवार मैदानात, सदा सरवणकर माहीमधून लढणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
अपूर्वा जाधव October 23, 2024 02:13 AM

Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election 2024) शिवसेना शिंदे गटाकडून (Shinde Group) पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 45 आमदारांची ही यादी असून अनेक विद्यमान आमदारांना या यादीमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

अमित ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाकडून उमेदवार मैदानात उतरवण्यात आला आहे. पण आता उद्धव ठाकरे त्यांच्याविरोधात उमेदवार देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.