एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी समोर, विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, 45 नावं जाहीर
वैभव परब, एबीपी माझा October 23, 2024 02:13 AM

Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिदेंच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक असून आता शिवसेनेने आता 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकतं 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी आता 45 उमेदवार जाहीर केले आहेत. शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी 

1. एकनाथ शिंदे - कोपची पाचपाखाडी 
2. साक्री - मंजुळा गावीत
3. चोपडा - चंद्रकांत सोनवणे 
4. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील 
5. पाचोरा - किशोर पाटील 
6. एरंडोल - अमोल पाटील 
7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील 
8. बुलढाणा - संजय गायकवाड 
9. मेहकर - संजय रायमुलकर 
10.दर्यापूर - अभिजीत अडसूळ 

माहिममधून सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे. 

राजापूर - किरण सामंत , उदय सामंत यांच्या बंघूंना संधी

पैठण - खासदार संदिपन भुमरे यांच्या मुलाला विलास भुमरे यांना तिकिट 

एंरडोल - माजी आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील



© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.