महायुतीच्या प्रचाराची सुरवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापुरातून करणार आहेत. त्यांच्या सभेची ताराखी निश्चित झाली आहे. गुरुवारी (ता. 7) कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमित शाह सभा घेणार आहेत. या मतदारसंघात काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील निवडणुकीसाठी उभे आहेत.
Laxman hake : निवडणुकीतील जरांगेंची भूमिका संपली - आंबेडकरओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारक असतील. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना लक्ष्मण हाके हे वंचितचे स्टार प्रचारक असतील असे सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकतील मनोज जरांगे यांची भूमिका संपल्याचे देखील आंबेडकर म्हणाले.
Vanchit Manifesto : बोगस आदिवसी दाखले रद्द करण्याचे आश्वासनवंचित बहुजन आघाडीने आपला जाहीरनाम्यात आरक्षणा संदर्भात आणि शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. जाहीरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल. बोगस आदिवासी दाखले रद्द करू हक्काच्या वंचित वाटप करू तसेच अनुसूचित जाती जमातीच्या उद्धारासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी कायदा करण्याचे तसेच सोयाबीन व कापूस वेचणी करणाऱ्या मनरेगाकडून पाच हजार रुपये प्रति किलो अनुदान देण्याचे आश्वासन वंचितच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
Raju Parve Join BJP : राजू पारवेंनी सोडली एकनाथ शिंदेंची साथएकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी माजी आमदार राजू पारवे यांनी आज (मंगळवारी) शिवसेनेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उमरेड मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर राजू पारवे यांनी सुरुवातीला बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केल्यानंतर राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Shivsena UBT : देवरांच्या शोभायात्रेत पैसे घेऊन लोक सहभागी?शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार मिलिंद देवरा यांची तक्रार करण्यात आली आहे. मिलिंद देवरा हे वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढत आहेत. वरळी येथील शोभायात्रेत 500 रुपये देऊन यात्रेत सहभागी झालो असल्याचे लोकांनी कबूल केला आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी तक्रार अनिल देसाई यांनी दिली आहे. आचारसंहितेचा भंग मिलिंद देवरा यांनी केला असून यांच्यावरती कडक कारवाई करावी अनिल देसाई यांची मागणी केली आहे. या मागणीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.
Vishal Patil : जयश्री पाटील माझ्या उमेदवार- विशाल पाटीलसांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या जयश्री पाटील यांना खासदार विशाल पाटील यांनी पाठींबा दिला आहे. जयश्री पाटील या माझ्या उमेदवार आहेत, असे जाहीर सभेत विशाल पाटील यांनी सांगितले. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यास सक्षम नसल्याची टीका देखील विशाल पाटील यांनी केली.
सत्तेत आल्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार, असे आश्वासन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मुलींसोबत मुलांना ही मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार आले तर आम्ही महिला पोलिसांची भरती करणार असून महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे उभे करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मुंबईमध्ये स्वस्तात घरे देणार संकल्प असल्याचे ठाकरे म्हणाले. ते राधानगरी येथे बोलत होते.
संजय वर्मा नवीन पोलिस महासंचालकसंजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांना या पदावरून हटवण्यात आल्यानंतर संजय वर्मा यांची वर्णी लागली आहे.
Aba Bagul News : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागुल यांना मिळाला 'हिरा'पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले नेते आबा बागुल यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठांनी समजूत काढली तरीही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. याच आबा बागुल यांना आता 'हिरा' हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे.
Eknath Shinde: घरात बसून नाही तर, लोकांच्या दारात जाऊन आम्ही काम करतोय...'शिवसेना आणि धनुष्यबाण ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही,' असे सांगत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सोमवारी हल्लाबोल केला होता. त्याला एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. "बाळासाहेबांचा गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही मुक्त केला. आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारांत, बांधावर जात आहोत. घरात बसून नाही तर लोकांच्या दारात जाऊन आम्ही काम करतोय," असा टोला त्यांनी लगावला. महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
Maharashtra Assembly Elections 2024 : पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाईऐन निवडणुकीच्या रणधुमालीत पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटींची रोकड जप्त केली आहे. पोलिस निरीक्षक निलेश तांबेंनी ही कारवाई केली आहे. तर ही रोकड नेमकी कोणाची आहे याबाबतचा तपास सुरू आहे.
Sawantwadi Assembly Constituency : भाजपकडून बंडखोर उमेदवाराची हकालपट्टीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठांनी समज देऊन देखील त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत त्यांची हकालपट्टी केली आहे. शिवाय निवडणूक काळात परब यांना मदत करणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देखील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
Kolhapur North Assembly Election : छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदरचसतेज पाटील यांनी कोल्हापुरातूल घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. मी कालच्या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला असून आता कसं जायचं यावर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदरच आहे आणि गादीचा सन्मान ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Heena Gavit : हिना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठीऐन विधानसभा निवडणुकीत तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपला अखेरचा रामराम केला आहे.
Satej Patil News : अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठककाँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. कालच्या घडामोडीनंतर विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन या बैठकीत केलं जाणार आहे.
Maharashtra Assembly Election : संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोलअमेरिकेतील निवडणूक मतपत्रिकेवर होत आहे ही बाब देशातील निवडणूक आयोगाच्या लक्षात येत नसेल का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाते नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शिवाय यावेळी त्यांनी राज्यात सरकारी गाड्यांमधून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसंच यावेळी त्यांनी मोदी-शहांवर हल्लाबोल करतानाच राज ठाकरेंवरही टीका केली.
NCP AP News : विधानसभेसाठी अजितदादांचा वादा काय? उद्या कळणारविधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे.
Salman Khan threat : सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी!बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानला सतत धमकीचे फोन येत आहेत.
Pune Congress : बंडखोरांना काँग्रेसचा इशारापुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना पक्षाकडून प्रस्ताव दिला जाणार आहे. अर्ज माघारीची मुदत संपूनही अर्ज कायम ठेवले असले तरी त्यांनी आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा अन्यथा त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Shivsena News : दोन्ही शिवसेना नेत्यांच्या तोफा कोल्हापुरात धडाडणारविधानसभा निवडणुकीला अवघे 15 दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. अशातच आज दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते कोल्हापुरातून प्रचाराला सुरूवात करणार आहेत.