राहुल गांधींवर आरोप करणाऱ्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी चौकशी करावी; विजय वडेट्टीवार यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
तुषार कोहळे November 06, 2024 02:13 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून राहुल गांधी (Rahul Gandhi) कोणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी आज (6 नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, आज त्यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. अशातच याच मुद्यावरुन आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रत्युत्तर देत जोरदार पालटवार केला आहे.

राहुल गांधींना अर्बन नक्षल म्हणणे म्हणजे सामाजिक संस्थांचा अपमान करणे होय. आता हे घाबरले आहे. त्यामुळे फडणवीस असे बोलत आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री असेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यंत्रणा आहे, त्यामुळे त्यांनी चौकशी करावी. असे थेट आव्हानही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी  दिले आहे.

तर भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय?

सामाजिक संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कुठलाही राजकीय अथवा पक्षाचा कार्यक्रम नाही. या सगळ्या संस्थांनी राहुल गांधींना आमंत्रित केलं आणि त्यांचे निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं, म्हणून राहुल गांधी नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. राहुल गांधी यांचा आजचा नागपूर दौरा हा अराजकीय कार्यक्रम आहे. नागपूरमधून आज प्रचाराच नारळ फोडला जात नाहीये. प्रचारच नारळ फोडायला वेळ आहे. ओबीसी युवा एकता मंच या सामाजिक संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान, आपला नेता येत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आज राहुल गांधी दीक्षाभूमी येथे जात आहे.  कारण संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरक्षा कवच दिले. तर भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर स्पष्टोक्ती दिली आहे. तर आज मुंबई येथे जाहीर होणारा जाहीरनामा हा ऐतिहासिक राहणार असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

गेल्या दहा वर्षापासून सरकारला या गोष्टी का आठवल्या नाही? गृहमंत्री अमित शहा शेतकऱ्यांचा कर्जमाफीला उघड विरोध केलेला आहे.  जर देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचा कर्जमाफीला विरोध करत असतील आणि तिथे कर्ज मुक्तीच्या घोषणेला राज्यातील भाजपचा पाठिंबा आहे का? हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे. राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. त्याचा राज्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली नाही. सर्वात जास्त घोटाळे शिंदे सरकारच्या काळात झाले आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.