यूएस निवडणूक क्रिप्टोकरन्सीने नवीन विक्रम केला: अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कमला हॅरिस (Kamala Harris) या पिढाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही (cryptocurrency) उत्साह संचारल्याचे दिसत आहे. आज बिटकॉइनसह अनेक चलनांच्या किंमती वधारला असून बिटकॉइनने (Bitcoin) आतापर्यंतची सर्वोच्च किंमत गाठली आहे. डॉजकॉइनमध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये खूप वाढ झाली आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोटा उत्साह पाहायला मिळत आहे. बिटकॉइनने आतापर्यंतची सर्वोच्च किंमत गाठली आहे. ट्रम्पचा यांचा निवडणुकीत विजय झाल्यास डिजिटल मालमत्ता क्षेत्राला खूप पुढे नेऊ शकतो. या आशावादामुळे क्रिप्टोची किंमत वधारत आहे. निवडणूक प्रचारात त्यांनी अमेरिकेला जागतिक क्रिप्टो हब बनवण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आज, बिटकॉइनच्या किंमतीत 8 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली आहे. किंमती 75 हजार डॉलर्सच्या पुढे पोहोचल्या आहेत. आतापर्यंतचा उच्चांक असून रुपयाच्या बाबतीत क्रिप्टोची किंमत आता 63 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्याचवेळी, डॉजकॉइन, अमेरिकन उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची आवडती क्रिप्टोकरन्सी20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..