IND vs SA: पहिली टी-20 मॅच कधी आणि कुठे?, टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार?
Times Now Marathi November 06, 2024 08:45 PM

IND vs SA 1st T20I: आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच सीरिज पार पडली. या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला मायदेशातच पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यात चार मॅचेसची टी-20 सीरिज होणार आहे. या सीरिजमधील पहिली मॅच शुक्रवारी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी खेळवली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 कशी असू शकते त्यावर एक नजर टाकुयात...

न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात 3 टेस्ट मॅचेसची सीरिज गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम आता 4 मॅचेसची टी-20 सीरिज दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळणार आहे. पण टेस्ट टीमपेक्षा टी-20 टीम पूर्णपणे वेगळी असणार आहे. सर्व तरुण प्लेअर्स टीम इंडियाचा भाग असणार आहेत. भारताच्यी टी-20 टीमची कमान सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. सीरिजमधील पहिली टी-20 मॅच शुक्रवारी (8 नोव्हेंबर) डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

टीम इंडियाचे ओपनर कोण?
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये ओपनिंग करताना दिसू शकतात. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये दोघांनी एकत्र ओपनिंग केली होती. इनिंगची सुरुवात करताना संजू सॅमसनने हैदराबादमध्ये दमदार सेंच्युरी सुद्धा केली.

तिलक वर्मा मिडल ऑर्डरमध्ये...
मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव याच्यासोबत तिलक वर्मा दिसण्याची शक्यता आहे. तिलक दीर्घकाळानंतर टी-20 टीममध्ये दिसून येणार आहे. त्याने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात शेवटची टी-20 मॅच खेळली होती. हार्दिक पांड्या सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. यानंतर रिंकू सिंग आणि अक्षर पटेल सुद्धा फिनिशिंग करतना आपल्याला दिसून येतील.

बॉलर्स कोण?
अक्षर पटेलच्या शिवाय टीम इंडियात वरुण चक्रवर्ती दुसरा स्पिनर म्हणून खेळवले जाऊ शकते. यासोबतच रवी बिश्नोईला सुद्धा संधी दिली जाऊ शकते. अर्शदीप सिंग आणि आवेश खान या फास्ट बॉलर्सला टीममध्ये खेळवण्यात येऊ शकते. अशा प्रकारे टीम इंडियाकडे 3 फास्टर आणि 3 स्पिनर्सचे पर्याय असतील.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.