BGT 2024-25; रोहित शर्माची जागा घेणार केएल राहुल?
Marathi November 07, 2024 12:24 AM

भारत अ विरूद्ध ऑस्ट्रेलिया अ (India A Australia A) संघात दुसरा अनधिकृत कसोटी सामना (7 नोव्हेंबर) पासून सुरू होणार आहे. हा सामना मेलबर्नमध्ये रंगणार आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला होता. आता दुसऱ्या सामन्यासाठी केएल राहुल (KL Rahul) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) 2 खेळाडूंचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान एका मीडिया रिपोर्टनुसार, केएल राहुल (KL Rahul) उद्यापासून (7 नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या सामन्यात सलामीवीर फलंदाजाची भूमिका बजावू शकतो.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, केएल राहुल (KL Rahul) (7 नोव्हेंबर) पासून ऑस्ट्रेलिया अ विरूद्धच्या सामन्यात अभिमन्यू ईश्वरनसोबत सलामीला येऊ शकतो. अशा स्थितीत पहिल्याच सामन्यात सलामी देणाऱ्या कर्णधार रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) फलंदाजी क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वैयक्तिक कारणांमुळे भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) बाॅर्डर गावसकर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. दोन्ही संघातील पहिला सामना (22 नोव्हेंबर) पासून पर्थ येथे खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल (kl Rahul) आणि अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) जर ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरले, तर रोहित शर्माच्या जागी यशस्वी जयस्वालसह दोघांपैकी एक पहिल्या कसोटीत भारतासाठी सलामी देऊ शकतो.

केएल राहुलच्या (KL Rahul) कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी कसोटीत 2014 साली पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 53 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 33.87च्या सरासरीने फलंदाजी करताना 2,981 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 राहिली आहे. कसोटीमध्ये राहुलने 15 अर्धशतकांसह 8 शतके झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

10 वर्षात पहिल्यांदाच असे घडले, दिग्गज फलंदाज कोहलीला कसोटी क्रमवारीत मोठा झटका!
टी20 वर्ल्डकप गाजवणारा महाराष्ट्राचा पठ्ठा आता आयपीएलमध्ये खेळणार!
बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली तरी टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचू शकते, कसं ते जाणून घ्या

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.