उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, लोकसभेला उमेदवारी दिलेल्या नेत्या शिंदेंच्या शिवसेनेत, पालघरमध्ये ठाकरे गटाला खिंडार
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर November 07, 2024 02:13 AM

Uddhav Thackeray , पालघर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाला पालघर जिल्ह्यामध्ये मोठं खिंडार पडलय. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनाच्या लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यानंतर आता भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत चार लाख मत मिळाले होती.  पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी  पक्षप्रवेश पार पडला.

पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या भारती कामडी यांच्यामध्ये लढत झाली होती. हेमंत विष्णू सावरा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला. मात्र, आता भारती कामडी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. सावरा यांना पालघर लोकसभा निवडणुकीत 6 लाख 1 हजार 244 मतं मिळाली. तर कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मतं मिळवली होती. दोन्ही उमेदवारांमध्ये 1 लाख 83 हजार 306 मतांचा फरक होता. तर तिसऱ्या क्रमांकाच्या बहुजन विकास आघाडी या हितेंद्र ठाकूर यांच्या राजेश पाटील या उमेदवारानं 2 लाख 54 हजार 517 मते मिळवली होती. 

एकनाथ शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे फेक नेरेटिव्ह चालले. आरक्षण जाणार, संविधान बदलणार तसेच मुस्लिम, आदिवासी, ख्रिश्चन समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र नंतर लोकांना आपली फसगत झाल्याचे दिसून आले त्यामुळे यावेळी फेक नेरेटिव्ह सेट होऊ न देण्याचे आव्हान आपल्यापुढे असल्याचे मत व्यक्त केले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला भगिनींना सन्मान देण्यासाठी आपण सुरू केली. मात्र ही योजना बंद कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी महाविकास आघाडीवाले कोर्टात गेले. पैसे मिळाल्यावर पटापट काढून घ्या म्हणाले, या योजनेत आचारसंहितेचा अडसर येणार आणि विरोधक त्याचेच फेक नेरेटिव्ह तयार करणार हे वेळीच ओळखून आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले. आता निवडणूक झाली की डिसेंबर महिन्याचे पैसे देखील त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे यासमयी नमूद केले.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar : राज्यातील 64 हजार महिला-मुली बेपत्ता आहेत, स्त्रीयांवरील अत्याचाराची संख्या वाढलीये : शरद पवार

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.