Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : शिवसेना कोणाची? सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल नाहीच
Sarkarnama November 07, 2024 01:45 AM
Chief Justice D. Y. Chandrachud : शिवसेना कोणाची? सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल नाहीच

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल येण्याच्या, आशा मावळल्या आहेत. 8 नोव्हेंबर हा विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीची संभाव्य तारीख 18 नोव्हेंबर आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त होत असल्याने आता नव्या पीठाकडे हे प्रकरण वर्ग केलं जाणार आहे.

जातनिहाय जनगणना होणारच - राहुल गांधी

नागपूरमध्ये संविधान कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जातनिहाय जनणगणना होणारच आणि ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडणार असल्याचं बोलून दाखवलं.

US Presidential Election Result 2024 : डोनाल्ड ट्रम्प विजयी...

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा 277 जागांवर विजय झाला आहे. तर कमला हॅरीस यांना 226 मते मिळाली आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार येणार हे निश्चित झालं आहे.

Rajaratna Ambedkar On Manoj jarange Patil : मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहणार - राजरत्न आंबेडकर

दलित आणि मुस्लिम संघटनांनी यादी दिली नाही म्हणून आम्ही निवडणूक लढू शकत नाही हे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं कारण चुकीचं असल्याचा दावा राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. दलित आणि मुस्लिम संघटनांनी आधीच आपली यादी जरांगे यांच्याकडे दिली होती. निवडणूक न लढण्याच्या जरांगे यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, आम्ही यादी दिली नाही म्हणून निवडणूक लढू शकलो नाही हे जरांगे यांनी दिलेल्या कारणामुळे समाजामध्ये गैरसमज पसरू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांना यादी दिली होती ही भूमिका स्पष्ट केली. शिवाय आपण मराठा समाजाच्या पाठीशी कायम उभे राहणार असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Nationalist Congress Manifesto : अजितदादांचा बारामतीकरांना वादा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून आज विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी त्यांनी बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचं ध्येय असल्याचं सांगितलं. कर्करोग उपचारासाठी बारामतीत रुग्णालय उभारणार असल्याचंही अजितदादांनी यावेळी सांगितल.

Sanjay Raut On Devendra Fadnavis : तुमची फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका

राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू, ही आमची भूमिका आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पनेची चेष्टा केली. तुम्ही शिवरायांचा गैरवापर करत आहात. देवेंद्र फडणवीस तुमचे पूर्वज मोगलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राशी गद्दारी करत होते. त्यामुळे ही फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका, अशी बोचरी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Election : शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर

शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. उद्यापासून शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यानंतर त्यांच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात सभा होणार आहेत. शरद पवारांच्या पाठोपाठ जयंत पाटील सुद्धा राज्यातील बहुतांश मतदारसंघात सभा घेणार आहेत. पाटील यांच्या 55 पेक्षा जास्त सभा होणार असल्याची माहिती आहे.

US Election Result 2024 Update : कमला हॅरिस यांनी पिछाडी भरून काढली

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांत मोठ्या घडामोडी होत आहेत. सुरूवातीला पिछाडीवर असणाऱ्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची मोठी घोडदौड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात केवळ 20 जागांचा फरक आहे. कमला हॅरिस यांनी 210 जागांवर आघाडी घेतली आहेत तर ट्रम्प 230 जागांवर आहेत.

Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी धमकीचे फोन

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आत्ता त्यांच्या निकटवर्तीयांनी धमकीचे फोन येत आहेत. सलमान खानला आतापर्यंत तीन ते चार वेळा धमकीचे फोन आले आहेत. अशातच आचा एकाला थेट पाकिस्तानच्या नंबरवरून धमकीचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 'बाबा सिद्दिकी गेले आता तू पण जाणार आणि तुझी मुलं पण जाणार', अशी धमकी या निकटवर्तीयाला देण्यात आली आहे. तर दुसऱ्या एकातडून पाच कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याची माहिती आहे.

CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर CM शिंदे करणार सभांची 'हाफ सेन्चुरी'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील 12 दिवसात 48 सभा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसाला 4 सभा मु्ख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे पुढील 12 दिवसांत महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते विदर्भ, मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशात सभा घेणार आहेत.

US Election Result 2024 News : कमला हॅरिस 112 वरून थेट 179 जागांवर

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांची आकडेवारीत वेगाने बदल होत आहेत. काही वेळापूर्वी मतमोजणीदरम्यान पिछाडीवर असलेल्या कमला हॅरिस (Kamala Harris) दमदार पुनरागमन केलं आहे. त्या सध्या 179 जागांवर आघाडीवर घेतली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प हे 214 जागांवर पुढे आहेत.

NCP News : राष्ट्रवादी कुणाची? अजितदादा की शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाला नवं चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या पक्षाकडून केली गेली होती. मात्र कोर्टाने ती मागणी मान्य केली नव्हती. त्यानंतर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कोर्ट काही वेगळे निर्देश देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

US Election Results 2024 : डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर

रॉयटर्सच्या दिलेल्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 162 मतांची आघाडी दिसून येत आहे. तर कमला हॅरीस 81 मतांसह पिछाडीवर आहेत.

BJP News : 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

भाजपने बंडखोर पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश न पाळणाऱ्या जवळपास चाळीस बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा देखील समावेश आहे.

Yogi Adityanath on Maharashtra tour : योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्र दौरा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते वाशिम, अमरावती, अकोला जिल्ह्यात त्यांच्या सभा होणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.