पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात येत आहे. पुण्यातील बिबवेवाडीत फडणवीस यांची जाहीर सभा
नांदेड उत्तरच्या जागेवरून ठाकरे गटात वाद; बबन थोरत यांच्या विरोधात घोषणाबाजीनांदेड उत्तरच्या जागेवरून ठाकरे गटात मध्ये मोठा वाद सुरू झालाय.ठाकरे गटाने आयत्या वेळी संगीता पाटील डक यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक नाराज झालेत.आज ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी हॉटेल विसावा येथे शिवसैनिकांची बैठक बोलावली होती.. परंतु बबन थोरात यांना शिवसैनिक आक्रमक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर थोरतांनी नांदेडमध्ये येणं टाळलं.परंतु शिवसैनिक बबन थोरात यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. बबन थोरात यांनी नांदेडची शिवसेना विकली असा आरोप करत थोरात शिवसैनिकानी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.
Election Commission: निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात 280 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केलीय. निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात २८० कोटी रुपयांचा मुद्देमाल आयोगाने जप्त केलाय. यात ७८ कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आलीय. तर, झारखंडमध्ये १५८ कोटी रुपये जप्त करण्यात आलेत.
पुढच्या वर्षी लागणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकालशिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीची संभाव्य तारीख १८ नोव्हेंबर ८ नोव्हेंबर हा विद्यमान सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस आहे.
Pune News : पोर्शे कार अपघात प्रकरण; फरार आरोपी अरुणकुमार सिंगचं कोर्टात आत्मसर्मपणरक्ताचे नमुने बदल प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. फरार आरोपी अरुणकुमार सिंग याने सरेंडर केलं आहे. पुणे न्यायालयासमोर अरुणकुमार सिंग यांनी स्वतःला सरेंडर केलं. कारचालक मुलासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी विशाल आणि शिवानी अग्रवाल, अरुणकुमार सिंग यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले होते. अरुणकुमार सिंग यांची चौकशीसाठी पोलीस कोठडीत रवानगी होणार आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमनमनसे प्रमुख राज ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन झाले आहे. ढोल तशाच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. मंगकवेढ्यात आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यासाठी राज ठाकरे घेत आहेत जाहीर सभा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरूसुप्रीम कोर्टाकडून डिस्क्लेमर बाबत विचारणा करण्यात आलीय. आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असा डिस्क्लेमर दिला जात असल्याचं अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलं. तुम्ही प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये हा डिस्क्लेमर देत आहात का ? असाही सवाल कोर्टाने केलाय.
डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्बने उडवून टाकू, धमकीचा मेलपिंपरी चिंचवड शहरातील डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता दरम्यान ईमेल द्वारे डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे..
देवेंद्र फडणवीसआज आनंदाची गोष्ट आहे की,महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात आज जतमधून होत आहे. महाराष्ट्रातील एक नंबर मतदार संघाऐवजी सगळ्यात शेवटचं 288 क्रमांक मतदारसंघातून केली आहे. जतमधून गोपीचंद पडळकरांना आशीर्वाद द्या, राज्यात 1 नंबरचा विकास करू. दुष्काळचे राजकारण केले गेले,पाणी सोडले तर साखर कारखान्याला ऊस तोड मजूर मिळणार नाही,म्हणून पाणी दिले नाही. छगन भुजबळमहायुतीने मला उमेदवारी दिलीय. उमेदवाराचा आमदार करणं तुमच्या हातात आहे. पर्यटन मंत्री असताना राज्यातील महत्वाची मंदिरे, धार्मिक स्थळ धार्मिक पर्यटन म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. धार्मिक पर्यटन स्थळ विकसित केलं. काम खूप झाली आहेत. Maharashtra News Live Updates : नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनाला सुरुवात लोणावळा भाजपकडून महायुती चा धर्म पाळत अधिकृत उमेदवाराला पाठिंबाराज्यात सर्वत्र महायुती म्हणून सर्वजण काम करत असतानाच मावळ विधानसभा मतदारसंघात मात्र महायुती मध्ये फूट पडली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे देत बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर मात्र मावळमध्ये महायुतीत फूट पडली असल्याचे चित्र दिसले. परंतु आता लोणावळयातील भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतला असून महायुती चे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांना लोणावळा भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता मावळमध्ये खुद्द भाजपमध्येच दोन गट तयार झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मावळमध्ये प्रत्येक पक्षात उभी फूट पडत दोन गट तयार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मावळचा गड कोण राखणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे...
Maharashtra News Live Updates : राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाहनाची तोडफोडअकोल्यातल्या अकोट शहरात राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट फैजान मिर्झा यांच्या वाहनाचे काचा फोडण्यात आलेय. काही अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड झाल्याच समजते. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी मिर्झा यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्यात. दरम्यान या प्रकरणात अकोट शहर पोलीस अधिक तपास करतात. मिर्झा यांच्या वाहनाचे काचा कुणी फोडल्या? आणि कोणत्या कारणांमुळे? याचा तपास पोलीस करतायत.
Maharashtra News Live Updates : राहुल गांधी नागपूरमध्ये दाखलसंविधान सन्मान संमेलनाच्या साठी राहुल गांधी चे नागपूर विमानतळावर आगमन झाले आहे. थोड्याच वेळात दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. रेशीमबाग मधील सुरेश भट सभागृहात संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार आहेत.
Maharashtra News Live Updates : मोहन प्रकाश यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भाच्या वरिष्ठ निरीक्षक नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर आरोप करताना उल्लेख केलेली लाल पुस्तक नागपुरातही झळकली. आज राहुल गांधी नागपूर आत संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार आहेत. त्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले असून त्यामध्ये राहुल गांधींच्या हातात संविधान दाखवण्यात आले असून ते लाल रंगाच्या पुस्तकाच्या स्वरूपात आहे. Maharashtra News Live Updates : जाहिरातीवर खर्च केला नसता तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले असते - बानगुडे पाटीलनितीन बानगुडे पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन जाहिरात बाजी केली. जर जाहिरातीवर खर्च केला नसता तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले असते. अशी टीका केली ते मिरजेत महाविकास आघाडी च्या बैठकीत बोलत होते. तानाजी सातपुते शिवसेनेचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि निवडणुकीच्या आधी सर्व सामन्याचा आमदार असल्याचे ही जाहीर केले.
Maharashtra News Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन व्यावसायिकावर आयटीची छापेमारीछत्रपती संभाजीनगर शहरातील सुराणा आणि संचेती या दोन मोठ्या बांधकाम व्यवसायिकावर आयकर विभागाने धाडी टाकले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको, पानदरिबा आणि वैजापूर शहरांमध्ये आयकर विभागाच्या वतीने तपासणी सुरू आहे. आज पहाटेपासूनच वेगळ्या टीम सध्या काम करीत आहेत.
Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांना यादी दिली होती - राजरत्न आंबेडकरयादी दिली नाही म्हणून आम्ही निवडणूक लढू शकत नाही हे जरांगे पाटील यांचं कारण चुकीचं असल्याच राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलंय. दलित आणि मुस्लिम संघटनांनी आधीच आपली यादी जरांगे पाटील यांच्याकडे दिली होती असेही राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले, निवडणूक लढायची नाही या जरांगे पाटील यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र मराठा आणि मुस्लिम संघटनांनी यादी दिली नाही म्हणून निवडणूक लढू शकलो नाही हे जरांगे पाटील यांनी दिलेल्या कारणामुळे समाजामध्ये गैरसमज पसरू शकतो. त्यामुळे आम्ही दलित आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवारांची यादी जरांगे पाटील यांच्याकडे दिली हे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यापुढेही जे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत त्यांचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय. आपण मराठा समाजाच्या पाठीशी कायम उभे राहणार असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी म्हंटलय. अनेक उमेदवार आपल्या जमिनी विकून नोकऱ्या सोडून निवडणुकीला उभे आहेत अशा उमेदवारांना आम्ही बळ देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
बंडखोर, महेश गायकवाडमहाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ज्याने कल्याण पूर्व भकास केलं, पोलीस स्टेशन रक्तरंजित केलं. कल्याण पूर्वेत शिवसेना संपवण्याचा डाव टाकला. त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, जनतेच्या वतीने निवडणूक लढवतोय, जनतेने मला चेहरा केलाय. BJP : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची पक्षातून हकालपट्टीभाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत ते बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.. मात्र पक्षाने माघार घ्यायला सांगूनही मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.. भाजपकडे असलेकी नेवसा विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली असून याठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आल्याने बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी केली आहे
यशवंत सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा..धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या यशवंत सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी महायुतीच्या पाठिंब्याची घोषणा केली. मागील दीड वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावे यासाठी यशवंत सेनेने अनेक आंदोलन केली आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे आज लातूर दौऱ्यावरमनसे प्रमुख राज ठाकरे हे आज लातूर दौऱ्यावर आहेत, लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर आणि लातूर ग्रामीण, या तीन मतदारसंघातील मनसे उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी ते आज जाहिर सभा घेणार आहेत.
शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणाररद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात शरद पवारांच्या सभा
शरद पवार यांच्या पाठोपाठ जयंत पाटील सुद्धा राज्यातील बहुतांश मतदारसंघात घेणार सभा
जयंत पाटील यांच्या राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा
१३ तारखेनंतर शरद पवार पुण्यात घेणार सभा
बारामती मध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ १८ तारखेला विराट सभा
बारामती १८ तारखेला होणार शरद पवारांची भव्य सभा
शिवरायांचा स्वाभिमान फडणवीस आणि शिंदेंनी सूरतला गहाण ठेवलाय - संजय राऊतांचा हल्लाबोल Maharashtra Marathi News Live Updates : महायुतीच्या प्रचारासाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर Maharashtra Marathi News Live Updates : शरद पवारांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा होईल. शरद पवार राजकारणातील महामेरू आहेत, असे संजय राऊत म्हणाले. Maharashtra Marathi News Live Updates : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अमरावती दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टीपक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधान केल्याने केली कारवाई...
तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती
Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभांची 'हाफ सेंन्चुरी' करणारविधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभांची करणार 'हाफ सेंन्चुरी'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील १२ दिवसात ४८ सभा घेणार आहेत.