केटो फ्लू उपचार टिप्स: केटो फ्लू दूर ठेवा
Marathi November 07, 2024 07:24 AM

वजन कमी करण्यासाठी आणि परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे डायट फॉलो करतो. यामध्ये कीटो डायट पूर्ण दुनियेत खूप प्रसिद्ध आहे. हे हाय फॅट आणि लो कार्ब डायट फॉलो केल्याने शरीर कीटोसिस स्थितीमध्ये जाते. आणि मग फॅट बर्न होऊ लागतात. परंतु कीटो डायट फॉलो करणं वाटतं तितकं सोपं नाही. हे डायट फॉलो करताना अनेकांना कीटो फ्लूचा सामना करावा लागतो.

जेव्हा तुम्ही आहारातील कार्ब्सचं प्रमाण कमी करता तेव्हा तुम्हाला थकवा आणि आळस येऊ लागतो. असं होऊ शकतं की तुम्हाला कीटो फ्लूमुळे तुमचं डायट फॉलो करणंच अवघड होऊन जाईल आणि तुम्हाला निराशाजनकही वाटू शकेल. परंतु काही लहानसहान उपाय करुन तुम्ही कीटो फ्लूच्या समस्येपासून स्वत:ला वाचवू शकता. जाणून घेऊयात कीटो फ्लू कसा दूर ठेवावा याबद्दल.

– जाहिरात –

हायड्रेटेड रहा :

जेव्हा तुम्ही कीटो डायटवर असता तेव्हा तुमच्या शरीराच्या हायड्रेशनची खास काळजी घ्यावी लागते. हा कीटो फ्लूपासून वाचण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. खरंतर, जेव्हा तुम्ही कार्ब्स कमी खाण्यास सुरुवात करता तेव्हा तुमचं शरीर पाणी आणि इलेक्ट्रोलाइटस कमी करण्यास सुरुवात करतं. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा,थकवा आणि डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठीच डायट करत असताना भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्ही वाटल्यास शरीरातील इलेक्ट्रोलायटसला बॅलेन्स करण्यासाठी पाण्यात चिमूटभर मीठ घालून किंवा इलेक्ट्रोलायटयुक्त बोन ब्रोथदेखील तुम्ही पिऊ शकता.

– जाहिरात –

आहारात मेदयुक्त पदार्थांचा समावेश करा :

कीटो डायट फॉलो करत असताना तुम्हाला फॅट अधिक प्रमाणात घ्यायचं असतं. आणि अशामध्ये तुम्हाला हेल्दी फॅटचं सेवन करायला हवं. फॅट खाल्ल्याने आपले शरीर इंधनाच्या स्वरुपात या फॅटचा वापर करते. प्रयत्न करा की तुम्ही अॅवाकॅडो, ऑलिव्ह ऑईल, नारळाचं तेल आणि शेंगदाणे यासारखे हेल्दी फॅटस घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे केवळ फॅट बर्न होत नाही. तर तुम्हाला पोट भरल्यासारखंदेखील वाटतं. सोबतच कार्ब्स कमी झाल्यामुळे तुमचा कीटो फ्लूचा धोकाही कमी होतो.

कार्ब्स खाणे पूर्णपणे बंद करू नका :

एकदम कार्ब्स आहारात घेणे अजिबात बंद करू नका. बऱ्याचदा असं पाहिलं जातं की जेव्हा लोक कीटो डायट करू लागतात तेव्हा कार्ब्स खाणे पूर्णपणे बंद करतात. ज्यामुळे कीटो फ्लू होण्याची शक्यता अधिक वाढते. यासाठीच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की कार्ब्स पूर्णपणे बंद होता कामा नयेत. तुम्ही एक- दोनआठवड्यांसाठी कार्ब्सचं सेवन हळूहळू कमी करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला कीटो डायटमध्ये अॅडजस्ट करण्यासाठी मदत मिळू शकेल. हळूहळू कार्ब्सचं प्रमाण कमी केल्यामुळे शरीराला मोठा धक्का सहन करावा लागत नाही. आणि तापासारखी लक्षणंही कमी होतात.

हेही वाचा : Mental Health : आयुष्यात तणावमुक्त राहण्यासाठी करा या गोष्टी


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.