जलजीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ जयपूर
जलजीवन मिशन घोटाळ्याप्रकरण राजस्थानात भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने (एसीबी) माजी मंत्री अन् काँग्रेसचे नेते महेश जोशी आणि 22 अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहेत. आरोपींमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे देखील सामील आहेत. राज्यात सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी एसीबीने ही कारवाई केली आहे. जलजीवन मिशन अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर वित्तीय अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले होते.
याप्रकरणी वित्तीय सल्लागार सुशील शर्मा, तत्कालीन मुख्य अभियंता आर.के. मीणा, दिनेश गोयल यांच्या विरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एसीबीकडुन गुन्हा नोंदविण्यात आल्याने माजी मंत्री महेश जोशी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढील काळात त्यांना अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे मानले जात आहे.