Kamal Haasan Net Worth: आयकॉनिक स्टार कमल हसन (Kamal Haasan) यांनी चाईल्ड अॅक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून मल्टिटॅलेंटेड अभिनेता आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भूरळ घालत आहे. तसं पाहायला गेलं तर, कमल हसन दाक्षिणात्या सिनेसृष्टीत खूप अॅक्टिव्ह असून त्यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्यानं खूप नाव आणि फेम कमावलं आहे. जाणून घेऊयात, अभिनेत्याच्या नेटवर्थबाबत सविस्तर...
DNA इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, कमल हसनचं नेटवर्थ 450 कोटी रुपये आहे. कमल हसन यांच्या इनकमबाबत बोलायचं झालं तर, तो अॅक्टिंग फी, प्रोडक्शन हाऊस, ब्रँड एंडोर्समेंट, फॅशन ब्रँड, टेलिव्हिजन शोमार्फत कमाई होते. तर, टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कमल हसन एका फिल्मसाठी 100 कोटी रुपये चार्ज करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी इंडियन 2 साठी तब्बल 150 कोटी रुपये मागितले होते. दरम्यान, कमल हसन बिग बॉस तमिळसुद्धा होस्ट करतात. यासाठी ते बक्कळ मानधन घेतात. त्यांनी बिग बॉसच्या सातव्या सीझनसाठी 130 कोटींची कमाई केली होती. याव्यतिरिक्त कमल हासन यांनी डिजिटल असेट्समध्येही इव्हेस्ट केलं आहे.
View this post on Instagram
तसं पाहायला गेलं तर, कमल हसन यांची लाईफस्टाईल लग्झरी आहे. याबाबत ते एखाद्या बॉलिवूड अभिनेत्यालाही सहज मागे टाकतात. फायनांशिअल एक्सप्रेसनुसार, कमल हसन यांचा चेन्नईमध्ये एक बंगला आहे. तेथील त्यांच्या संपत्तीची किंमत तब्बल 131 कोटी रुपये आहे. एवढंच काय तर, कमल हसन यांची परदेशातही प्रॉपर्टी आहे. लंडनमध्ये त्यांचं स्वतःचं घर आहे. ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 2.5 बिलियन असल्याचं सांगितलं जातं.
कमल हसन यांना कार्सची फार आवड आहे. त्यांचा कार कलेक्शनबाबत काय बोलायचं... त्यांच्या ताफ्यात BMW 730LD आणि Lexus Lx 570 यांसारख्या लग्झरी कार्स आहेत.
कलम हसन यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी वयाच्या 5 वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. तेव्हापासूनच ते चित्रपटांमध्ये काम करायचे. कमल हसन यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आजही त्यांच्या हातात अनेक चित्रपट आहेत. यापूर्वी ते कल्कि 2898 AD मध्ये दिसून आले आहेत. या चित्रपटात त्यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. आता ते आगामी चित्रपट इंडियन 2, इंडियन 3 आणि ठग लाईफमध्ये दिसून येणार आहेत.