8 संरक्षण शेअर्स जे तुमच्या पोर्टफोलिओला बनवतील रॉकेट; दमदार परताव्यासाठी ब्रोकरेजकडून लक्ष्य किंमत जारी
मुंबई : शेअर मार्केटमध्ये रिकव्हरीची सुरुवात दिसत असून गेल्या काही महिन्यांत संरक्षण शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या विभागातील 8 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 70% पर्यंत वरचे लक्ष्य दिले गेले आहे. यामध्ये पीटीसी इंडस्ट्रीज, भारत डायनॅमिक्स, आझाद इंजिनिअरिंग, डायनॅमिक टेक्नॉलॉजीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स या नावांचा समावेश आहे.
पीटीसी इंडस्ट्रीजPTC Industries साठी 20070 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 6 नोव्हेंबरला हा शेअर 12000 रुपयांवर बंद झाला. येथे गुंतवणुकदारांना 70 टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
भारत डायनॅमिक्स Bharat Dynamics साठी 1745 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 6 नोव्हेंबर रोजी हा शेअर 1080 रुपयांवर बंद झाला. येथे गुंतवणुकदारांना 62 टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
आझाद इंजिनिअरिंग Azad Engineering साठी 2450 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 6 नोव्हेंबरला हा शेअर 1683 रुपयांवर बंद झाला. येथे गुंतवणुकदारांना 45 टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
डायनॅमिक टेक्नॉलॉजीजDynamatic Technologies साठी 10250 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 6 नोव्हेंबरला हा शेअर 7510 रुपयांवर बंद झाला. येथे गुंतवणुकदारांना 36 टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
अस्ट्रा मायक्रोवेव्हAstra Microwave साठी 935 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले आहे. हा शेअर 6 नोव्हेंबरला 815 रुपयांवर बंद झाला.
भारत इलेक्ट्रॉनिक्सBharat Electronics साठी 350 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 6 नोव्हेंबरला हा शेअर 300 रुपयांवर बंद झाला. येथे गुंतवणुकदारांना 17 टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
सोलर इंडस्ट्रीज Solar Industries साठी 13250 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हा शेअर 6 नोव्हेंबरला 10224 रुपयांवर बंद झाला.
झेन टेक्नॉलॉजीजZen Technologies साठी 2000 रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 6 नोव्हेंबरला हा शेअर 1901 रुपयांवर बंद झाला.
(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)