Cancer : साडीप्रेमींनो सावधान, घट्ट परकर बांधल्याने होतो कॅन्सर
Marathi November 07, 2024 06:24 PM

साडीकडे महिलेचा पारंपारीक पोशाख म्हणून पाहिले जाते. काही महिला रोज साडी नेसतात तर काही विशेष समारंभाला साडी नेसतात. पण, आज आम्ही तुम्हाला असे म्हटले की, साडीमुळे महिलांना कॅन्सरचा धोका निर्माण होतो, तर तुमचा विश्वास बसणार नाही. कितीही नाकारले तरी साडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या परकरमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. साडीतील परकरमुळे कॅन्सरचा धोका कसा निर्माण होतो, यावर उपाय काय आहेत, हे पाहूयात

घट्ट परकरमुळे कॅन्सरचा धोका –

साडी खोचण्यासाठी परकर वापरण्यात येतो. खरं तर, साडी किंवा साडीतील परकरमुळे नाही तर काही चुकांमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो. तु्म्ही साडीतील परकर जास्त घट्ट बांधल्याने कॅन्सर होऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या महिलेने जास्त वेळ साडी नेसली घट्ट परकरमुळे कंबरेला घर्षण होऊ शकते, व्रण उठू शकतात. ज्यामुळे त्वचा सोलून काळी पडते. वारंवार जेव्हा हे होऊ लागते तेव्हा कॅन्सरसारख्या गंभीर आजार होऊ शकतो.

– जाहिरात –

कंबरेभोवती कोणतेही कापड घट्ट बांधल्याने या आजाराचा धोका निर्माण होतो. खाज येते, रॅशेस येतात. या समस्येपासून दुर राहण्यासाठी तुम्ही कंबरेभोवती घट्ट परकर बांधू नका, शक्य असल्यास घरात मोकळे कपडे घाला. कंबरेची नियमित स्वच्छता राखा.

– जाहिरात –

पुरूषांमध्ये टाइट जीन्स कारणीभूत –

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला पुरूषांमध्ये टाइट जीन्स कारणीभूत मानली जाते. जेव्हा आपण घट्ट कपडे जास्त वेळ घालतो, तेव्हा शरीराच्या त्या भागातील ऑक्सिजनचा प्रवाह विस्कळीत होतो. तसेच असेही म्हटले जाते की, टाइट जीन्समुळे शुक्रांणूची संख्या कमी होते आणि कॅन्सरचा धोका निर्माण होते.

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.