SA vs IND : रोहितच्या कॅप्टन्सीबाबत काय वाटतं? सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेआधी सर्वच सांगितलं
GH News November 08, 2024 01:08 AM

टीम इंडियाचा टी 20i कर्णधार सूर्यकुमार यादव याने रोहित शर्मा याची पाठराखण केली आहे. विजय होवोत किंवा पराभव, मुंबई इंडियन्सचे खेळाडू कायम एकमेकांच्या पाठीशी असतात. सूर्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित शर्मा च्या कॅप्टन्सीबाबत प्रश्न करण्यात आला. त्यावर सूर्याने हार-जीत होत असल्याचं म्हटलं. प्रत्येक जण विजयासाठी प्रयत्न करत असतो. मात्र काही वेळा या प्रयत्नांना यश मिळतं तर कधी नाही, असं सूर्याने म्हटलं. आयुष्यात बॅलन्स कसा राखयचा हे मी रोहितकडून शिकलोय. विजय असो किंवा पराभव, मी रोहितमध्ये कधीच बदल झालेला पाहिला नाही. मी रोहितला कायम कॅप्टन आणि खेळाडू म्हणून प्रगती करताना पाहिलंय. आपली टीम कशी कामगिरी करतेय हे एक नेतृत्व पाहत असतं, असंही सूर्याने नमूद केलं.

सूर्यकुमार काय म्हणाला?

“मी रोहित भाईकडून खूप काही शिकलो आहे. मी त्याच्यासोबत खूप फ्रँचायज क्रिकेट खेळलो आहे. मी मैदानात असताना रोहितचं निरीक्षण करतो. रोहितची देहबोली, दबावात असताना तो कसा सामना करतो? रोहित शांत असतो, गोलंदाजांसह कसं बोलतो आणि दुसऱ्यांसोबत त्याचा व्यवहार कसा आहे? आपल्यासोबत आपल्या नेतृत्वाने वेळ घालवावा अशी आपल्याला आशा असते. मी पण तसंच वागण्याचा प्रयत्न करतो” असं सूर्यकुमार म्हणाला.

“मी जेव्हा मैदानात नसतो तेव्हा मी सहकाऱ्यांसह वेळ घालवतो. त्यांच्यासोबत जेवायला, बाहेर फिरायला, प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की या लहान लहान गोष्टी मैदानात महत्त्वाच्या ठरतात. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या सहकाऱ्याने चांगली कामगिरी करायला हवी, तर वरील सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत”, असं सूर्याने म्हटलं.

“स्वातंत्र्य म्हत्तवाचं”

“माझी एक कॅप्टन म्हणून बॅटिंग स्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. मी कर्णधाराइतका आक्रमक होऊ शकत नाही. पण तुमच्या आजूबाजूला काय घडतंय हे तुम्हाला समजायलं हवं. माझे सहकारी काय विचार करतायत हे मला समजून घ्यायला हवं. त्यांना मोकळीक देणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाकडे काही तरी असतं. प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असतं. आपला मुद्दा मांडायचा असतो. हे स्वातंत्र्य म्हत्त्वाचं आहे”, असंही सूर्याने स्पष्ट केलं.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.