Maharashtra Election 2024 Uddhav Thackeray criticized Mahayuti in Congress 5 guarantee program asj
Marathi November 08, 2024 03:24 AM


मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसने आपली पंचसूत्री जाहीर केली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या मंचावर उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला. “देशभरात नुकतीच सर्वांनी दिवाळी साजरी केली. पण आपल्याकडे ऍटम बॉम्ब आहेत. पलीकडून फुलबाज्या, तुडतुड्या, सुरसुरी सुरू आहेत, त्याचं चालू द्या. 23 ताखेरला आपल्याला विजयाचे फटके फोडायचे आहेत. असाच दृढनिश्चय करण्यासाठी आपण जमलो आहोत,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. “योजनांचा पाऊस आणि अमलबजावणीचा दुष्काळ, हे नेहमीच झाले आहे. हा दुष्काळ आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे.” असे म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली. (Maharashtra Election 2024 Uddhav Thackeray criticized Mahayuti in Congress 5 guarantee program)

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : मविआची पंचसूत्री जाहीर; महिलांसाठी दरमहा 3 हजार, बेरोजगारांना 4 हजार 

– Advertisement –

“वाढत्या महागाईवर ना मोदी ना शिंदे, हे कोणीच आवर घालू शकत नाहीत. आनंदाचा शिधा यावर बोलायचं झाले तर, त्यामध्येदेखील उदारांच्या लेंढ्या मिळतात, हा कसला आनंद यांचा?” असे म्हणत उद्धव ठाकरे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते पुढे म्हणाले की, “आपण जे करतो ते खुलेआम करतो. आम्ही शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले. तसेच, आता आपण मुलांना कौशल्य विकासाचे शिक्षण देणार आहोत. मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहोत. रोजगार मिळेपर्यंत काय करायचे? हे पंचसूत्रीत आहे. प्रत्येक बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांची मदत करणार आहोत.” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. “आमचे सरकार आल्यानंतर 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रित ठेवण्याचे काम करून दाखवू. तेही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता, असा आश्वासनदेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, “राज्यातील प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून 90 हजार रुपये काढले जात आहेत, ही किती धक्कादायक गोष्ट आहे. जीएसटीसारख्या करांचा बोजा वाढवत असून उद्या हे श्वास घ्यायला देखील टॅक्स लावतील. एकीकडे आपले खिसे कापले जात आहेत, त्यावरून यांच्या योजना येत आहेत,” असे म्हणत महायुतीच्या योजनावरून त्यांनी टीका केली.

– Advertisement –

“तरुणांना का नाही आर्थिक मदत करायची? बेरोजगार आपले भविष्य आहे. यांच्यामुळे तरुण नासत असून त्यांना उभारी देणार कोण? आपण त्यांना उभारी देणार आहोत.” असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले की, “संविधानाची प्रत राहुल गांधींनी दाखवली. मी वर्षा गायकवाड यांना म्हटले मलाही द्या. कारण खूप छान आहे, संविधान. संविधान वाचवायचेच आहे, अजून पूर्णपणे वाचलेले नाही आहे. महाराष्ट्राची निवडणूक ही त्यासाठीच महत्त्वाची आहे. संविधान बचाव फेक नरेटिव्ह वाटत असेल, तर धारावीचा जो मुद्दा आम्ही काढत आहोत, फक्त धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई ही अदानीच्या घशात घालण्याचे जे जीआर निघाले ते फेक नरेटीव्ह होऊ शकतात? अदानीच्या घशात जागा दिल्या जातात. हे लोकं मुंबईला अदानीमय करत चालले आहेत. आमचे सरकार आल्यावर चुकीच्या निविदा काढल्या, ज्या सवलती अदानीला देऊन मुंबई नासवली जाते ते कंत्राट रद्द करू. आम्ही धारावीकरांना सुविधा दिल्याशिवाय घर दिल्याशिवाय राहणार नाही,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.