Uddhav Thackeray, अमरावती : "गेल्यावेळी लोकसभेला मी तसा इकडे आलो नव्हतो. एकच सभा हॉलमध्ये घेतली, पण त्यालाही सभा म्हणता येणार नाही. पण तरी देखील अमरावतीकरांनी कमाल केली. आपल्या हक्काचा, एक साधा माणूस दिल्लीमध्ये पाठवला. हेच मला आता पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन लोकसभा लढली होती. ती तुम्ही जिंकून दाखवली. म्हणून मी तुम्हाला शतश: धन्यवाद देण्यासाठी आलेलो आहे. हीच एकी मला विधानसभेत पाहिजे. खरं तर अमरावती लोकसभा पारंपारिक शिवसेनेचे होती. गेल्यावेळी काहीतरी झालं आणि कोणीतरी तुमच्या डोक्यावर बसलं होतं, पण आता तुम्ही ते भूत उतरवलं", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचे बडनेरा विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुनिल खराटे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी नव्याने महाराष्ट्र उभारून दाखवीन. टाटा एअरबसचा प्रकल्प विदर्भात येणार होता, तो फडणवीसांनी गुजरातला जाऊ दिला. महाराष्ट्राच्या हाती भिकेचा कटोरा आणि गुजरात डामडौल हे चालणार नाही़. मी महाराजांचे मंदिर बांधतो म्हटल्यावर देवाभाऊंना इंगळ्या डसल्यात. ठाणे जिल्ह्यात तुम्हाला मंदिर बांधलं जात असल्याची खात्री नसेल तर ठाण्याच्या दाढीवाल्याला लाथ मारून हाकला. भाजपमधून एक-एक फुटतोय, त्यांना सांभाळा. कोरोनात आपलं राज्य सांभाळू न शकलेल्या योगींनी आम्हाला शिकवू नये.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,सुनील खराटे आपला उमेदवार आहे. ज्याच्या हातामध्ये मशाल तोच आपला उमेदवार आहे. बाकी इकडे तिकडे बघायचं नाही. आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. काल कुणीतरी इकडे आलं आणि बोलून गेलं. एक रहेंगे तो सेफ रहेंगे. मग दहा वर्ष बसून केलं काय?. आम्ही इकडे सेफ आहोत. आम्हाला तुमची गरज नाही. गेली दहा वर्षे आम्ही त्यांच्या सोबत होतो. आम्ही त्यांचा कारभार पाहिला आहे. पण संकट काळात ज्यांनी शिवसेनेची मदत घेतली आणी खुर्ची मिळाल्यावर शिवसेना खतम करायला निघाले त्यांना महाराष्ट्रात शिल्लक ठेवायचं? माझा महाराष्ट्र स्वावलंबी पाहिजे दिल्लीकडे भिकेसाठी हात पसरणारा नको. दिल्ली माझ्या महाराष्ट्राकडे आली पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.
आपले आदर्श पुसून टाकायचं काम सध्या चाललं आहे. शिवाजी महाराजांची नाही तर मग काय मोदींची मंदिरं बांधायची? या लोकांना चोरीची सवय झाली आहे. चोरीचा मामला जोरजोरात बोंबला असं सगळं सुरु आहे. ज्याचा शिवसेनेशी संबंध नाही तो सुद्धा माझ्या वडिलांचा फोटो लावतोय. आता तुम्हाला मोदींच्या नावाची खात्री राहिली नाही? सोनू तुला माझ्यावर विश्वास नाही का असे म्हबतात तसंच यांचं झालं आहे, मोदींवर विश्वास नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
जर गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर आज मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं असतं. रोज महिलांवर अत्याचार वाढत आहे. आज कोणीच सुरक्षित नाहीये म्हणून योगीजी म्हणतात एक रहो, नहितो जुते खाओंगे. योगी म्हणतात तेच होईल आपलं विभागानी होईल म्हणून महाविकास आघाडी एक रहा, असंही ठाकरे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या