आरोग्य सेवेच्या माध्यमातून आमदार श्वेताताई महाले यांनी शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले. विकासकन्या ही बिरुदावली आपल्या कामातून श्वेता ताई महाले यांनी सिद्ध केली आहे. हे करत असताना मातृहृदयी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांची वेगळी ओळख जन माणसांमध्ये रुजली. आरोग्य सेवा हीच खरी जनसेवा असल्याने त्यातून अनेकांचे कुटुंब सावरण्याचे काम आमदार श्वेताताई महाले यांनी केले. यात वैरागड येथील अंगद गव्हाणे यांची प्रतिक्रिया बोलकी ठरते.
वैरागड येथील अंगद गव्हाणे हे गावामध्येच आपला मंडप व्यवसाय करून, जवळ असलेल्या शेतीमध्ये भाजीपाला व्यवसाय तसेच कधी रोजंदारीवर विजतंत्री म्हणून काम करत होते. कष्टाने आपला संसार फुलवत असताना १४ मे २०२४ चा दिवस अंगद यांच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. विजेच्या खांबावर जाऊन काम करत असताना अंगद खांबावरून खाली पडले. गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना संभाजीनगर येथे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल एक महिना उपचार झाल्यानंतर जवळ असलेली कष्टातून केलेली सर्व बचत उपचारामध्ये खर्च झाली. त्यातही अंगद यांची प्रकृती फार सुधारली नाही त्यामुळे गव्हाणे कुटुंबीय नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. अंगद यांना गावाकडे परत आला चिखली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तब्बेत खालावत चालली होती आणि उपचारासाठी जवळ काहीच नव्हते." इकडे आड तिकडे विहीर" या परिस्थितीमध्ये असताना वैरागड येथील भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख गजानन रसाळ यांनी ही बाब चिखली मतदार संघाच्या आमदार आरोग्याच्या बाबतीत मतदार संघातील एकही माणूस वंचित राहता कामा नये याची काळजी घेणाऱ्या श्वेता ताई महाले यांच्या कानावर टाकली. ताईंनी तत्काळ ब्रीच कँडी रुग्णालय मुंबई येथे संपर्क करून अंगद गव्हाणे यांना इमर्जन्सी मेडिकल सर्विस मधून उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्याचे सांगितले. रुग्णवाहिकेची व सोबत एका डॉक्टर ची व्यवस्था करून अंगद यांना त्याच रात्री मुंबई येथे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सुमारे महिनाभरपेक्षा अधिक कालावधीत अंगद यांच्यावर रुग्णालयामध्ये मोफत उपचार झाले. दरम्यानच्या काळात नियतीने आणखी एक डाव टाकला. अंगद गव्हाणे परिवाराचा प्रमुख आधारस्तंभ आहेत आणि या घराच्या प्रमुख व्यक्तीची अशी अवस्था बघून त्यांच्या वडिलांना सुद्धा ब्रेन हॅम्रेज झाला आणि त्यांना सुद्धा उपचारासाठी संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले अशा दुहेरी संकटात सापडलेल्या गव्हाणे परिवारासाठी आमदार श्वेताताई ह्या देवदूत म्हणूनच धावत आल्या. अंगद दादा यांच्या वडिलांच्या उपचारासाठी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपयांची मदत मिळवून दिली. दुहेरी संकटाच्या परिस्थिती आमच्या कुटुंबासाठी आमदार ताई धावून आल्या म्हणूनच आम्ही आज वाचलो अशा प्रतिक्रिया अंगद गव्हाणे व कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.