मारुती मंदिर सभागृहात झालेल्या छोटे खाणी सभेत आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली गत अनेक वर्ष यशस्वीपणे काम केले. मतदार संघाचा विकास केला. यापुढे हीच विकासाची गती कायम ठेवली जाईल. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता शहरातील नागरिकांनी विकासाचे राजकारण पुढे नेण्यासाठी धनुष्यबाण निशाणीचे बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करावे . महायुती एकसंघपणे कार्यरत असल्याने हा विजय आणखी मोठा असेल.
बाहेरचे उमेदवार स्वतःच्या स्वार्थासाठी रिंगणात: डॉ.सुभाष लोहिया..
आपल्या भाषणात भाजपचे नेते डॉ. सुभाष लोहिया म्हणाले की, इथे महायुतीची प्रचंड हवा असल्याने इतर सर्व उमेदवार निश्चितपणे हवेत उडून जातील. आमदार संजय रायमुलकर सर्व गावांमध्ये तगडा संपर्क ठेवून असल्याने व विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे त्यांच्यापुढे कोणीही प्रतिस्पर्धी असला तरी तो निश्चितपणाने पराभूत होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गेली तीस वर्ष प्रतापराव जाधव ,संजय रायमुलकर यांनी लोकांशी सतत संपर्क ठेवलेला असून ते अहोरात्र जनतेच्या सेवेत असतात. ज्यांना कोणीच ओळखत नाहीत ,असे बाहेरचे उमेदवार रिंगणात आहेत. हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आले आहेत .त्यामुळे जनता त्यांना भीक घालणार नाही. हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व घटकांनी संजय रायमुलकर यांच्या धनुष्यबाण निशाणीवर शिक्का मारून त्यांना विक्रमी मतांनी विजय करावे असे आवाहनही डॉ. लोहिया यांनी केले. महायुतीला पोषक वातावरण असून रायमुलकर एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील ,असा विश्वास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. आशाताई झोरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
भाई कैलास सुकदाने आपल्या भाषणात म्हणाले की, विरोधातील उमेदवार जेव्हा काँग्रेसच्या मंत्र्याचा उपसचिव होता तेव्हा त्याने दुधाळ जनावरांसाठी अनुदान योजनेचे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर केले होते व सिंदखेड राजा तालुक्यातील अर्ज मंजूर केले होते. केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक लढविण्यासाठी तो उमेदवार आला आहे .परंतु लोक त्याला भीक घालणार नाहीत .कारण प्रतापराव जाधव यांच्या अठरापगड जातींना जीवाभावाने सोबत घेऊन विकासाचे राजकारण करण्याच्या परंपरेचे पालन आमदार रायमुलकर करतात. त्यांनी दोन्ही तालुक्याचा प्रचंड विकास केलेला आहे वर्षात लोकांशी मोठा संपर्क निर्माण केलेला आहे, त्यामुळे विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही.