मिळालेल्या संधीचं सोनं करणं आणि समाजितासाठी अविरत परिश्रम करणं हे एका लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असतं. आमदार श्वेताताई महाले यांनी चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये शिक्षण, आरोग्य , पर्यटन विकास आणि सौंदर्यकरणाच्या अनेक कामांना प्राधान्य दिले. सोबतच अल्पसंख्यांक समुदायाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काही प्रमुख मागण्यांना सुद्धा पूर्णत्वाकडे नेले आहे. हिंदू मुस्लिम बांधवांसाठी श्रद्धेचा स्थान असलेल्या सैलानी दर्गा येथे वर्षभरातून यात्रेला लाखो भाविकांची मांदियाळी जमते. सैलानी मध्ये प्रसिद्ध असा संदल निघतो. या संदल रस्त्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेत कामाला देखील सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे चिखली शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वस्त्यांमध्ये २० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील सुमारे दहा कोटीपर्यंत रुपयांची कामे झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. ग्रामीण भागातील मुस्लिम वस्त्यांमध्ये सुद्धा अडीच कोटी रुपयांची २१ कामे करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने किन्होळा येथे शादीखाना बांधकाम, शेलुद तेथे अंतर्गत रस्ता , कब्रस्तान सौंदर्यीकरण , रायपूर सारख्या मोठ्या गावात सभा मंडप बांधकाम, धोत्राभनगोजी येथे शादीखाना बांधकाम अशा विविध विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.
श्वेताताई म्हणतात...
लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना जाती धर्माची बंधन आपण विकास करताना कधी पाहिली नाहीत. त्यामुळे चांगल्या कामाच्या पाठीशी मतदार नक्कीच उभा राहतील असा विश्वास श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला आहे...