राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलेला दावा छगन भुजबळ यांनी खोडून काढला आहे. शिवाय आपण यांचं पुस्तक वाचणार आणि त्यात काही चुकीचं किंवा खोटं आढळल्यास कारवाई करणार असल्याचंही भुजबळ म्हणाले.
Nandurbar Live News : निवडणूक काळात शरद पवारांना नंदुरबारमधून मोठा धक्का!नंदुरबारमधील शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 91 पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
Pandharpur Live News : पंढरपूरचे काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना पुन्हा मोठा धक्कापंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा उज्वला भालेराव, माजी नगरसेवक महादेव धोत्रे, ऋषीकेश भालेराव यांनी भगीरथ भालके यांची साथ सोडत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवाय त्यांनी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना समर्थन दिलं आहे. कालच मंगळवेढा येथील समविचारी आघाडीने भालकेंची साथ सोडल्यानंतर आज पंढरपूरातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा भगीरथ भालके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Mumbai Police Live News : मुंबईत 2.3 कोटींची रोकड जप्तमुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरातून ल 2.3 कोटींची रोकड जप्त केली असून या प्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर एल. टी. मार्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
Chhagan Bhujbal Live News : ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर - छगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली आणि ईडीपासून मुक्तीसाठी आपण भाजपमध्ये गेल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात हा मोठा दावा करण्यात आला आहे.
Pooja Khedkar Live News : वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीवादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. खेडकर विरोधात UPSC आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली आहे.
Amit Shah kolhapur visit : अमित शहांचा पश्चिम महाराष्ट्र दौराभाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सभा घेणार आहेत. तसेच ते कराड तालुक्यातही सभा घेणार आहेत.