राज्यात गेल्या काही दिवसांपासून एफडीएच्या धडक कारवाया वाढल्या आहेत. यातच आता, श्रीराम इंटरप्राइझविरोधात एफडीएने कारवाई केली आहे. निकृष्ट काजू जप्त करण्यात आले. प्रदक्षा चोपडेकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही कारवाई केली.
इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. गोव्यातील नेतेही महाराष्ट्रातील विविध पक्षातील नेत्यांचा प्रचार करण्यासाठी ते महाराष्ट्रात येत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील महाराष्ट्रात प्रचारसभा घेताना दिसणार आहेत. यातच आता, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी, इंडिया आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट यांनी त्यांचे स्वागत केले.
एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एंटर एअरच्या पहिल्या हंगामी चार्टर प्लाइट गोव्यात दाखल झाले. गोवा-पोलंड यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा मानस.
गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!गोव्याने रणजी करंडक प्लेट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मिझोरामचा एक डाव आणि 169 धावांनी पराभव करुन सलग चौथा विजय नोंदवला. फॉलोऑन लागू केल्यानंतर मिझोरामचा दुसरा डाव 182 धावांवर संपला. गोव्याच्या मोहित रेडकरने 5 विकेट्स घेतल्या.
प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्तमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर डिचोली पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी यावेळी बेकायदेशीर दारु जप्त केली.
गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंतगोव्याला पर्यटनाबरोबर उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे, जेणेकरुन जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि कौशल्य विकास केंद्रे पुढील पिढीला भविष्यातील आव्हानांसाठी तयार करु शकतील: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यात केवळ प्रदूषणरहित उद्योगांचे स्वागत: माविन गुदिन्होगोवा हे छोटे राज्य असल्याने प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहे. गोव्यात केवळ प्रदूषण न करणाऱ्या उद्योगांचे सरकार स्वागत करते. आम्हाला गोव्याचे वैभव जपायचे आहे: मंत्री मॉविन गुदिन्हो.
सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणी सध्या राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. सातत्याने सरकारवर आक्रमक हल्ले करत आहेत. या स्कॅममध्ये सरकारी अधिकाऱ्यांसह मंत्र्यांचांही हात असल्याचा आरोप विरोधक करतायेत. यातच आता, आम आदमी पक्षाकडून आंदोलनाचा इशारा दिला आहे. आप नेते अमित पालेकर यांनी या स्कॅमध्ये भाजपचे काही नेते गुंतल्याचा आरोप केला. त्यामुळे या स्कॅमची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकलाकर्णधार दर्शन मिसाळच्या प्रभावी 6 विकेट्समुळे गोव्याला रणजी ट्रॉफी प्लेट डिव्हिजन क्रिकेट सामन्यात मिझोराचा खेळ आटोक्यात आणण्याची मदत मिळाली. मिझोरामचा पहिला डाव 204 धावांवर संपुष्टात आल्याने गोव्याने 351 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना सुरेश काकोडकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.