नसरापूर, ता. ८ : भरधाव ट्रकच्या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा महामार्गावरील वरवे (ता. भोर) गावाच्या हद्दीत बुधवारी (ता.६) सकाळी घडली. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कवीयारस जय शंकर (रा. हारूर, धर्मपुरी, तमिळनाडू) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. गणेश पंढरीनाथ रांजणे (वय ३४, रा. वरवे खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे-सातारा महामार्गावर वरवे खुर्द गावच्या हद्दीत बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास टी. एन. ९३ ई. ६५९० हा ट्रक पुण्याकडे भरधाव जात होता. नीलकमल हॉटेलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ५५ ते ५० वर्षे वयाच्या पादचाऱ्याला या ट्रकने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीकडे ओळखीची कोणतीही खूण आढळलेली नाही. फौजदार संजय ढावरे तपास करत आहेत.