पिंपरी, ता. ८ : मतदार संघातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभागनिहाय जनसंपर्क कार्यालय उभारण्याची घोषणा आमदार अण्णा बनसोडे यांनी केली. पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ कासारवाडीत आयोजित प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार बनसोडे यांनी ही घोषणा केली.
कासारवाडी येथील सूर्यमुखी महादेव मंदिराचे दर्शन घेऊन, प्रचार फेरीला सुरवात करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक श्याम लांडे, माऊली थोरात, स्वाती ऊर्फ माई काटे, किरण मोटे, उल्हास शेट्टी, वर्षा जगताप, आरपीआयचे बाळासाहेब भागवत, कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे, संजय अवसरमल, ॲड. आतिष लांडगे, शेखर काटे आदींसह परिसरातील महायुती घटक पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
सूर्यमुखी महादेव मंदिराचे दर्शन घेऊन शास्त्रीनगर, जवळकर कॉलनी, गुलिस्ताननगर, हिराबाई झोपडपट्टी, जय महाराष्ट्र चौक, ज्ञानेश्वर कॉलनी, पिंपळे सदन, नाशिक फाटा मार्गाने जाऊन गोयल रेसिडेन्सी येथे प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी आमदार बनसोडे यांचे औक्षण केले. आमदार बनसोडे यांनी ज्येष्ठ नागरिक, नवमतदार यांच्याशी संवाद साधला.
फोटोः 60953