Vikramgad Assembly Election : पालघरमध्ये महायुतीत पडली वादाची ठिणगी; सेनेच्या प्रकाश निकमांच्या बंडखोरीमुळे भाजप धास्तावली
esakal November 09, 2024 08:45 AM

मोखाडा - शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष ऊमेदवार म्हणून विक्रमगड मध्ये भाजपपुढे आव्हान ऊभे केले आहे. त्यांच्या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सक्रीय झाल्याने, भाजप ची विक्रमगड ची जागा धोक्यात आली आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या पालघर आणि बोईसर मधील ऊमेदवारांचा प्रचार न करण्याचा ईशारा भाजप पदाधिकार्यांनी दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडली असुन, संतप्त झालेल्या भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी बंडखोर ऊमेदवार प्रकाश निकम व त्यांच्या प्रचारात सक्रीय झालेल्या शिवसेना पदाधिकार्यांवर कारवाई ची मागणी केली आहे. 

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाने निकराने जोर लावला होता. मात्र, जागा वाटपाच्या वाटाघाटीत भाजप ने ही जागा आपल्याकडे कायम राखली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी करत अपक्ष ऊमेदवार म्हणून भाजप पुढे आव्हान ऊभे केले आहे. त्यांनी जिजाऊ सामाजिक संघटनेचा आसरा घेतल्याने, विक्रमगड मध्ये भाजप ची धोक्यात आली आहे. भाजप ने निष्ठावंत कार्यकर्ते हरिश्च॔द्र भोये यांना येथुन ऊमेदवारी दिली आहे. 

बंडखोर ऊमेदवार प्रकाश निकम यांच्या प्रचारात, महायुतीतील विक्रमगड विधानसभेचे समन्वयक प्रदिप वाघ, सह समन्वयक चंद्रकांत रंधा, विक्रमगड तालुका प्रमुख सागर आळशी यांसह विभाग प्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व मोठ्या संख्येने शिवसैनिक सक्रीय झाले आहेत. त्यातच जिजाऊ सामाजिक संघटनेचा बॅनर निकमांनी घेतल्याने, महायुतीचे ऊमेदवार हरिश्च॔द्र भोये अडचणीत आले  आहेत. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांनी त्याविषयी जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्याकडे तक्रार केली आहे.

महायुतीत पडली वादाची ठिणगी

पालघर मधील पालघर आणि बोईसर या दोन्ही जागेवर शिवसेना शिंदे गटाचे महायुतीकडुन ऊमेदवार आहेत. विक्रमगड मध्ये शिवसेनेने बंडखोरी करून, बंडखोर ऊमेदवाराच्या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सक्रीय झाले आहेत. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. परिणामी, पालघर आणि बोईसर च्या शिवसेना शिंदे गटाच्या ऊमेदवारांच्या प्रचारात सहभागी न होता, कुठलेही सहकार्य न करण्याचा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ईशारा दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. 

बंडखोर ऊमेदवार व पदाधिकार्यांवर कारवाई ची मागणी

पालघर जिल्हा परिषदेत भाजप मोठा पक्ष असतांना, शिवसेनेच्या प्रकाश निकम यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले आहे. त्यांनी विक्रमगड मध्ये बंडखोरी करून अपक्ष ऊमेदवार म्हणून महायुतीलाच आव्हान दिले आहे. तसेच त्यांच्या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. त्यामुळे बंडखोर ऊमेदवार प्रकाश निकम व शिवसेना पदाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्याबाबत ची खदखद त्यांनी माध्यमांकडे व्यक्त केली आहे. 

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.