सध्या भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू झाला आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना किंग्समीड, डर्बन या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा स्टार सलामीवीर संजू सॅमसनने (Sanju Samson) शतक झळकावून इतिहास रचला.
संजू सॅमसनने (Sanju Samson) डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शानदार शतक झळकावत बॅटने वादळ निर्माण केले. सॅमसनचे हे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलग दुसरे शतक ठरले.
वास्तविक, संजू सॅमसन (Sanju Samson) भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. ज्याने सलग 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावले आहे. सॅमसनने डर्बनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 50 चेंडूंत 107 धावांची तुफानी खेळी खेळली. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 10 गगनचुंबी षटकार ठोकले.
सॅमसनच्या या शतकापूर्वी त्याने हैदराबादच्या मैदानावर बांगलादेशविरूद्धच्या शेवटच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 111 धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे सॅमसनचे हे सलग दुसरे टी20 आंतरराष्ट्रीय शतक ठरले. त्याच्यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 2 शतके झळकावता आली नव्हती. याशिवाय संजू सॅमसन (Sanju Samson) हा जागतिक क्रिकेटचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. ज्याने सलग 2 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मरता-मरता वाचला हा दिग्गज क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियात घडला जिवघेणा अपघात!
पूना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत करणदीप कोचर आणि क्षितिज नावेद कौल यांची संयुक्त आघाडी कायम
केएल राहुल आणि अथिया शेट्टीचं प्रेम कसं जमलं? पहिली भेट कुठे झाली होती? खूपच रंजक आहे लव्ह स्टोरी!