Rahul Dravid कडून महिला गोलंदाजाचे कौतुक! पाहा मुख्य प्रशिक्षकाची फटकेबाजी...Viral Video
esakal November 13, 2024 03:45 AM

The Royals Cricket Cup 2024 Organized By Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्स संघाकडून रॉयल्स क्रिकेट चषक २०२४, भारतातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक आंतर-शालेय मुलींची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली होती. आरसीए ग्राउंड, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात बिकानेरच्या संघाने विजय मिळवून स्पर्धेत विजेतेपद पटकावले. बिकानेरने १ लाखाच्या रोख बक्षीसासह विजेत्याची ट्रॉफी मिळवली, तर कोटा येथील उपविजेत्या संघाला ५०००० रूपये मिळाले. अंतिम सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विजेत्या संघासह फलंदाजी करताना पहायला मिळाले.

या सामन्याला क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड, क्रीडा सचिव नीरज के पवन आणि राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. खेळातील मुलींच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची उपस्थिती युवा क्रिकेटपटूंसाठी महत्वाची ठरली.

rajashtan royals.

राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड फायनलनंतर आपले विचार मांडताना म्हणाले, "या तरुण मुलींना अशा उत्कटतेने आणि निश्चयाने खेळताना पाहणे, ही भारतातील महिला क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याची आठवण करून गोष्ट देणारी आहे. रॉयल्स क्रिकेट चषक सारख्या स्पर्धा केवळ आनंदच देत नाहीत, तर या खेळाडूंमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण करतात. चॅम्पियन्स आणि सर्व संघांचे त्यांचे कठोर परिश्रम आणि खेळातील आत्मविश्वासासाठी अभिनंदन. ”

स्पर्धा संपल्यानंतर राहूल द्रविड यांनी स्पर्धेतील विजयी संघासमोर फलंदाजी केली. ज्यामध्ये विजयी संघातील एका गोलंदाजाने द्रविड यांना गोलंदाजी केली. ज्यामध्ये गोलंदाजाच्या अचूक टप्प्याच्या चेंडूवर द्रविड यांना टाळ्या वाजवत गोलंदाजाचे कौतुक देखील केले. द्रविड यांच्या फलंजदाजीचा व्हिडीओ राजस्थान रोयल्सच्या सोशल मीडिया हॅंडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये, "आई बाबा, मी नुकताच मुलींचा रॉयल्स कप जिंकला, त्याचबरोबर राहुल द्रविड यांना गोलंदाजीही केली. त्यांनी माझ्यासाठी थोडावेळ थांबून टाळ्या देखील बाजवल्या, " असा आशय लिहिण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्सचे सीईओ जेक लश मॅक्रम यांनी या स्पर्धेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले, “ही स्पर्धा क्रिकेटच्या माध्यमातून तरुण मुलींना सक्षम बनवण्याच्या आमच्या निर्धाराचे प्रतिनिधित्व करते. खेळाडू आणि प्रेक्षक या दोघांकडून आज जो प्रतिसाद आणि उत्साह पाहायला मिळाला, तो खरोखरच प्रेरणादायी होता. बिकानेर संघाला योग्य विजय मिळवून दिल्याबद्दल आणि ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व सहभागींचे अभिनंदन. आम्ही असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहोत, जिथे तरुण मुली चमकू शकतील आणि त्यांचे कौशल्य दाखवू शकतील."

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.