Health Tips : घरगुती काढा खोकल्यावर उपयोगी
Marathi November 14, 2024 11:25 AM

हिवाळा ऋतूची सुरुवात झाली आहे. वातावरणात थोडासा गारवा येताच सर्दी- खोकला आणि ताप लोकांना त्रास देऊ लागतो. छातीत जमा झालेल्या कफमुळे अनेकदा छातीत दुखणे, खोकला यांसारख्या समस्या निर्माण होतात. कधीकधी तर यामुळे श्वास घेणेही कठीण होऊन बसते. बदलत्या वातावरणामध्ये ही एक सामान्य समस्या आहे. परंतु यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी लोक बऱ्याचदा अँटिबायोटिक्सची मदत घेतात. परंतु याचे काही साईड इफेक्टसही असू शकतात. कफ दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही फायदेशीर ठरू शकतात. आज आपण जाणून घेऊयात अशा एका काढ्याविषयी जो छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी मदत करू शकेल.

कफावर गुणकारी घरगुती काढा :

तुळशीमध्ये अँटिबेक्टेरियल , अँटिबायोटिक, अँटिसेप्टिक आणि अँटिव्हायरल गुण असतात. ज्यामुळे सर्दी खोकला आणि ताप दूर होऊ शकतो.

– जाहिरात –

जर तुम्हाला खोकला सतावत असेल आणि छातीत कफ जमा झाला असेल तर तुळस यावर फायदेशीर ठरू शकते.

तुळस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि ऋतूमानानुसार होणाऱ्या आजारांपासून आपला बचाव करते, घशाला आराम देण्याचे आणि कफ कमी करण्याचे काम तुळस करते.

– जाहिरात –

आल्यामध्ये अँटिऑक्सिडंटस आणि अँटिबेक्टेरियल गुण असतात. जे सर्दी खोकला कमी करण्यासाठी मदत करतात.

आलं घशातील खवखवीवर आणि तापावरदेखील गुणकारी आहे.

काळीमिरी हा साधारणपणे मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखला जातो.

या काळीमिरीमध्ये देखील अँटिबेक्टेरियल गुण असतात. ज्याच्या सेवनाने सुका खोकला दूर होतो. ही काळीमिरी कफ कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.

यामुळे श्वासनलिका स्वच्छ होते आणि फुप्फुसांमध्ये जमा झालेला कफ सहजरित्या बाहेर पडू शकतो.

ओव्यामध्ये थायमोल नावाचा घटक असतो. हा छातीत जमा झालेल्या घट्ट कफाला पातळ करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

हळदीमध्ये अँटिइंफ्लेमेटरी आणि अँटिबेक्टेरियल गुण असतात. हे कफ बाहेर काढण्यासाठी मदत करतात. आणि सर्दी खोकल्यापासून आरामही देतात.

असा बनवा काढा :

साहित्य :

आले – अर्धा इंच
तुळस – 5 ते 7 पाने
काळीमिरी – 4 ते 5
ओवा – 1 चमचा
हळद – अर्धा चमचा
लवंग – 2

कृती :

1 ग्लास पाण्यामध्ये सर्व पदार्थ टाकून पाणी अर्ध होईपर्यंत उकळून घ्या.
यानंतर हे पाणी गाळून घ्या.
तुम्ही हे पाणी दिवसातून दोनदा पिऊ शकता.
यामुळे छातीत जमा झालेला कफ बाहेर पडेल आणि खोकलाही दूर होईल.

हेही वाचा : Hair Care Tips : केसांसाठी उत्तम आहे जिरेनियम तेल


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.