पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सोळूतील तरुणावर गुन्हा
esakal November 10, 2024 12:45 AM

आळंदी, ता.९: सोळू (ता.खेड) येथील ओंकार प्रशांत ठाकूर (वय २०, रा.माळवाडी, सोळू) याच्यावर विनापरवाना पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी
आळंदी पोलिसांनी शुक्रवारी (ता.८) गुन्हा दाखल केला.
ही घटना सोळूच्या हद्दीत माळवाडी येथील एका कंपनीसमोर रात्री साडेसातच्या दरम्यान घडली. याबाबत फिर्याद आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई बाळासाहेब खेडकर यांनी दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार याने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. तसेच अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसतानाही त्याने ४५ हजार रुपयांचे एक पिस्तूल आणि एक हजार रुपयांचे जिवंत काडतूस बाळगले. यामुळे ओंकारवर गुन्हा दाखल केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.